Fast: उपवासाला साबुदाणा- बटाट्यापेक्षा खा रताळी; ‘हे’ आहेत ५ फायदे

193
Fast: उपवासाला साबुदाणा- बटाट्यापेक्षा खा रताळी; 'हे' आहेत ५ फायदे
Fast: उपवासाला साबुदाणा- बटाट्यापेक्षा खा रताळी; 'हे' आहेत ५ फायदे

सध्या श्रावणामुळे घरोघरी उपवास (Fast) करणारा एक तरी व्यक्ती असतोच. कोणी श्रावणी सोमवार करतं, तर कोणी शनिवार करतं. श्रावण आहे म्हणून फक्त एकदा जेवण आणि एकदा फराळाचे खाणे, असाही नियम अनेक जणांचा असतो. उपवासाला नेहमीच भगर, साबुदाणा आणि बटाटा खाण्याव्यतिरिक्त दिवसातून एकदा तरी रताळे किंवा रताळ्यापासून बनवलेला पदार्थ खावा. यामुळे उपवासही होतो आणि तब्येतीचीही पुरेपूर काळजी घेतली जाते. उपवासाव्यतिरिक्त अन्य वेळीही रताळे खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, असंही आहारतज्ज्ञ सांगतात. त्यामुळेच बघूया रताळे खाण्याचे हे ५ फायदे.

मधुमेहींसाठीही फायदेशीर –

सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये सांगितलेलं आहे की, रताळे हे एक परफेक्ट फूड असून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी ते उपयुक्त ठरते. उकडलेल्या रताळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे मधुमेहींनी रताळे उकडून खावीत.
२. रताळ्यांमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्यामुळे हृदयविकार आणि कर्करोगचा धोका कमी करण्यासाठी रताळे खाणे फायदेशीर ठरते.
३. अनेक महिलांना पीसीओडीचा त्रास असतो. अशा महिलांनी नियमितपणे रताळी खायला हवीत.
४. रताळ्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ज्यांना अपचन, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता (कॉन्स्टिपेशन) असा त्रास होतो त्यांनी रताळे खावे.

(हेही वाचा :Raksha Bandhan : कुरिअरच्या जमान्यातही राख्या पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये गर्दी)

५. वजन कमी करण्यासाठी जे उपवास करतात, त्यांनीही रताळी खायलाच पाहिजेत. कारण रताळ्यांमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असल्याने वेटलॉससाठी त्यांची मदत होते.
६. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाणही चांगले असते. त्यामुळे डोळे, त्वचा चांगली राहण्यास फायदा होतो. तसेच रताळ्यांमध्ये व्हिटॅमिन बी आणि इतर खनिजेही चांगल्या प्रमाणात असतात.
७. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही रताळ्यांची मदत होते. त्यामुळे जे लोक वारंवार आजारी पडतात, त्यांनीही नियमितपणे काही प्रमाणात रताळी खावीत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.