ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)ची माहिती जगभरात पोहोचविण्याकरिता भारताने सात सर्वपक्षीय खासदारांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाची घोषणा केली होती. काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)ची माहिती न्यू यॉर्कमधील भारतीय दूतावासात दिली. यावेळी बोलताना शशी थरुर म्हणाले, दहशतवाद्यांनी प्रथम लोकांचा धर्म ओळखला आणि नंतर फक्त त्या आधारावर त्यांना मारले. जे हिंदू होते त्यांना मारले गेले, जे मुस्लिम होते त्यांना सोडून दिले गेले.
भारतीय दूतावासात बोलताना थरुर यांनी संपूर्ण जगाला दहशतवाद्यांच्या हेतूबद्दल सांगितले. एकाच धर्माच्या लोकांना (हिंदूंना) निवडकपणे मारण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. ज्या ज्या देशांमध्ये जाणार आहोत त्या प्रत्येक देशातील जनतेच्या आणि राजकीय मतांच्या विविध वर्गांशी जगभरातील अनेक लोकांना वेठीस धरणाऱ्या दहशतवादी कारवायांबद्दल सांगणार आहोत, असे शशी थरुर म्हणाले.
(हेही वाचा Battle of panipat : पानिपतच्या तीन ऐतिहासिक लढायांचे स्वरूप आणि महत्त्व वाचा, एका क्लिकवर )
काँग्रेस नेते तथा खासदार शशी थरुर म्हणाले, आज भारत-पाकिस्तानच्या सीमेवर वाजवी प्रमाणात शांतता आहे पण मूलभूत समस्या कायम आहे. आम्ही प्रत्येक देशातील कार्यकारी मंडळाच्या सदस्यांना, विधिमंडळाच्या सदस्यांना, मोठ्या कंपन्यांना आणि प्रभावी परराष्ट्र धोरण तज्ञांना भेटणार आहोत. त्याचबरोबर, प्रत्येक ठिकाणी मीडिया आणि जनमताशी संवाद साधणार आहोत, असेही शशी थरूर यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे जगासमोर वर्णन केले. भारत सरकारने सात सर्वपक्षीय खासदारांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर पाठविले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या स्वरूपात भारताच्या दहशतवादाविरोधातील कारवाईबाबत जगाला योग्य संदेश देण्याकरिता वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात थरूर यांचा समावेश आहे.(Operation Sindoor)
Join Our WhatsApp Community