Mumbai Train : सीएसएमटी स्थानकात २४ डब्ब्यांच्या एक्स्प्रेसला मिळणार थांबा

प्रतिमेल-एक्स्प्रेसची आसनक्षमता ८००ने वाढणार आहे.

17
Mumbai Train : सीएसएमटी स्थानकात २४ डब्ब्यांच्या एक्स्प्रेसला मिळणार थांबा
Mumbai Train : सीएसएमटी स्थानकात २४ डब्ब्यांच्या एक्स्प्रेसला मिळणार थांबा

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील  (Mumbai Train) (सीएसएमटी) फलाट क्रमांक १० ते १४ च्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या या फलाटांवर १२ ते १८ डब्यांच्या एक्स्प्रेस उभ्या राहू शकतात. मात्र फलाटांची लांबी वाढविल्यानंतर तेथे २४ डब्यांची एक्स्प्रेस उभी राहू शकणार आहे. फलाट विस्तारीकरणाचे पहिल्या टप्प्यातील ४५ टक्के कामे पूर्ण झाले आहे. यामुळे प्रतिमेल-एक्स्प्रेसची आसनक्षमता ८००ने वाढणार आहे.

सीएसएमटीमध्ये पायाभूत सुविधा उभारण्याचे काम हाती घेताना लोकलसह अन्य रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम होतो. यामुळे अनेक वर्षांपासून फलाट विस्तारीकरणाचा प्रकल्प रखडला होता. रेल्वेगाडीच्या डब्यांची संख्या वाढवण्यासाठी फलाटांचे विस्तारीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. सीएसएमटीवरून दररोज ९० लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुटतात. मात्र फलाट क्रमांक १० ते १४ ची लांबी कमी असल्याने येथे २४ डब्यांची रेल्वेगाडी उभी राहू शकत नाही. त्यामुळे मुंबई – पुण्यादरम्यान धावणाऱ्या एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या वाढविता आलेली नाही.

(हेही वाचा : Manish Sisodia : मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच; जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली)

या प्रकल्पासाठी एकूण  केंद्रीय अर्थसंकल्पात सीएसएमटीतील फलाट विस्तारीकरणासाठी ६० कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. पाचही फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सीएसएमटी – दादर विभागातील रेल्वेगाड्यांच्या वेगात आणखी सुधारणा करण्यात येईल, असा विश्वास मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
सीएसएसएमटीवरील फलाट क्रमांक १० आणि ११ ची सध्याची लांबी २९८ मीटर असून विस्तारीकरणानंतर ती ६८० मीटर इतकी होईल. फलाट क्रमांक १२, १३, १४ ची सध्याची लांबी ३८५ मीटर असून विस्तारीकरणानंतर ती ६९० मीटर होईल. सध्या फलाट क्रमांक १० ते १४ ची दुसऱ्या टप्प्यातील कामे सुरू आहेत. यात ओव्हर हेड वायर, सिग्नलिंग यंत्रणा, रेल्वेमार्ग जोडणी आदी कामे करण्यात येत आहेत, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.