
-
प्रतिनिधी
कल्याणमध्ये घडलेल्या अत्यंत दुर्दैवी इमारत दुर्घटनेत सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले आहे. (Kalyan Building Slab Collapse)
मुख्यमंत्री फडणवीस यांनी x (माजी ट्विटर) या सामाजिक माध्यमावरून प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की, “कल्याणमध्ये एका इमारतीचे छत कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत 6 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.” (Kalyan Building Slab Collapse)
(हेही वाचा – Fraud : महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या पतीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक)
घटनास्थळी महापालिका आयुक्त स्वतः उपस्थित राहून बचावकार्याचे नेतृत्व करत होते. दुर्घटनेत 5 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जखमींना लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थनाही केली आहे. सुदैवाने जखमींची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Kalyan Building Slab Collapse)
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही घटना केवळ इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने की अन्य कोणत्याही कारणाने घडली, याची चौकशी प्रशासनाकडून सुरू असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जाणार असल्याचे संकेतही मिळत आहेत. (Kalyan Building Slab Collapse)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community