ऋजुता लुकतुके
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs PBKS) संघाला घरच्या मैदानावर जिंकण्याचा फॉर्म्युला अजून सापडलेला दिसत नाही. पंजाब किंग्ज संघाविरुद्ध पाऊस पडत असल्यामुळे सामना उशिरा सुरू झाला. आणि तो प्रत्येकी १४ षटकांचा खेळवण्यात आला. आऊटफिल्ड ओलं असताना बंगळुरूने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतली. पण, त्यानंतर काहीही मनासारखं घडलं नाही. या हंगामातील यशस्वी सलामीची जोडी विराट आणि फिल सॉल्ट अपयशी ठरले. दोघांनी प्रत्येकी १ धाव केली. त्यानंतर तर फलंदाजांची तंबूत परतण्याची रांगच लागली. रजत पाटिदारच्या २३ आणि चीम डेव्हिडच्या नाबाद ५० धावा सोडल्या तर इतर फलंदाज फक्त हजेरी लावून परतले. आणि एकेरी धावसंख्येवरच बाद झाले. (RCB vs PBKS)
त्यामुळेच निर्धारित १४ षटकांत त्यांचा संघ ९ बाद ९५ धावाच करू शकला. त्यातही डेव्हिडने २६ चेंडूंत ५० धावा केल्यामुळे निदान समाधानकारक धावसंख्या उभारता आली. बंगळुरू संघात एकही भागिदारी झाली नाही. पॉवरप्लेमध्येच बंगळुरूने आघाडीचे ४ गडी गमावले होते. पंजाबकडून अर्शदीप, यानसेन, चहल आणि हरप्रीत ब्रार यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. विजयासाठी ९६ धावा करताना पंजाब संघाचीही दमछाक झाली. पण, अखेर नेहल वढेराने फटकेबाजी करत नाबाद ३३ धावा केल्या. आणि पंजाबला विजयी केलं. (RCB vs PBKS)
Match 34. Punjab Kings Won by 5 Wicket(s) https://t.co/7fIn60qSVr #RCBvPBKS #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2025
बंगलुरूची खेळपट्टी पावसानंतर काहीशी धिमी झाली असली तरी १४ षटकांत ९५ ही धावसंख्या पुरेशी नव्हतीच. आणि ती पार परताना पंजाबला फारसे कष्ट पडले नाहीत. नाही म्हणायला हेझलवूडने ३ षटकांत १४ धावा देत ३ बळी मिळवले. आणि एकाच षटकांत श्रेयस अय्यर आणि जोस इंग्लिस यांना बाद करत त्याने काही षटकं बंगलुरूसाठी आव्हान उभं केलं होतं. पण, नेहल वडेराने गरज असताना ३ षटकार आणि ३ चौकार ठोकत २३ चेंडूंत नाबाद ३३ धावा केल्या. आणि सामना पंजाबकडे झुकवला. (RCB vs PBKS)
या विजयामुळे पंजाबचे आता ७ सामन्यांतून १० गुण झाले आहेत. आणि गुणतालिकेत ते गुजरातच्या खालोखाल दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. तर बंगलुरूचा संघ ८ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे बंगळुरू संघाने या हंगामात आतापर्यंत ३ सामने गमावेल आहेत. आणि हे तीनही त्यांनी घरच्या चिन्नास्वामी मैदानावर गमावले आहेत. (RCB vs PBKS)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community