युध्दाच्या सावटामुळे भारत-पाकिस्तान(India-Pakistan War) या दोन्ही देशांत तणावाची परिस्थिती असताना पाकिस्तानवर चांगलाच दबाव वाढला आहे. भारताने पाकिस्तानवर केलेल्या राजनैतिक कारवाईनंतर आणखी मोठा धक्का पाकिस्तानला बसला आहे. एका रिपोर्टनुसार पाकिस्तानी सैन्य आणि बलूच लिबरेशन आर्मीमध्ये जोरदार चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. बलूच आर्मीकडून एका कॅम्पवर हल्ला करण्यात आला असून कॅम्पमधील शस्त्रास्त्रे त्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
(हेही वाचा India-Pakistan War : पंजाबमध्ये 2 पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक ! वायू सेनेची संवेदनशील माहिती आणि फोटो सापडले … )
दरम्यान, पाकिस्तानकडून भारताला युध्दा(India-Pakistan War)च्या पोकळ धमक्या मिळत असताना दुसरीकडे पाकिस्तानच्या कलात जिल्ह्यातील मंगोचर शहरातील अनेक इमारतींवर बलूच बंडखोरांनी कब्जा केला आहे. महत्त्वाचे म्हणजे बलूच आर्मीने मंगोचर शहरावर आपले नियंत्रण प्रस्थापित केल्याची माहिती देखील समोर आली आहे. बलूच लिबरेशन आर्मीने पाकस्तानी सैन्यांच्या एका कॅम्पवर हल्ला करत तेथील शस्त्रे ताब्यात घेतल्याचा दावा केला जात आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर चांगलाच दबाव वाढला असताना आधीच भारताकडून पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या आहेत. त्यातच आता बलूच आर्मीनेदेखील पाकिस्ताविरोधात बंड केल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व घडामोडींमुळे पाकिस्तानच्या संकटात आता आणखी भर पडली आहे. दरम्यान, पाकिस्तानी नेत्यांकडून सातत्यानं युध्दाची(India-Pakistan War) भाषा वापरली जात असताना पोकळ धमक्या देखील दिल्या जात आहेत. एका माहितीनुसार भारताने टाकलेला दबाव कमी करण्यासाठी आता पाकिस्तानने आपल्या मित्र राष्ट्रांकडे मदत मागताना दिसत आहे. (India-Pakistan War)
Join Our WhatsApp Community