राज्य कार्यकारिणीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अ‍ॅक्शन मोडवर

92
राज्य कार्यकारिणीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अ‍ॅक्शन मोडवर
राज्य कार्यकारिणीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अ‍ॅक्शन मोडवर

लवकरच होऊ घातलेल्या महापालिका निवडणुका, लोकसभा, विधानसभाची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. याच क्रमात राज्य कार्यकारिणीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अ‍ॅक्शन मोडवर दिसून येत आहेत. त्यांनी सर्व जिल्हा समन्वयकांना पक्ष विस्तारासाठी काम करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी बुधवारी दुपारी प्रदेश कार्यालयात महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

बैठकीमध्ये काय होणार?

या बैठकीत पक्ष वाढीसाठी कसे काम करायचे याच्या सूचना देणार असल्याचे समजते. तसेच या बैठकीत जिल्ह्याची बांधणी कशी सुरू आहे याचा घेणार आढावा घेतला जाणार आहे. याच सोबत येत्या काळात जिल्हा अध्यक्ष देखील बदलायचे आहेत याचाही आढावा घेतला जाणार असल्याचे समजते.

(हेही वाचा – ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येतील, १६ आमदार पात्र ठरतील; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा)

मुख्यमंत्र्यांनी सर्व खासदारांची बोलावली बैठक 

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाकडून प्रत्येक मतदारसंघानिहाय सध्या चाचपणी सुरू असल्याचे पाहायला मिळते आहे. खासकरून शिंदे गटात गेलेले खासदार आहेत, त्यांच्या मतदारसंघाचा प्रामुख्याने ते आढावा घ्यायला पाहायला मिळतायत. त्यादृष्टीकोनातून लवकरच उमेदवारांची निश्चिती होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील बुधवारी रात्री ८ वाजता वर्षा निवासस्थानी खासदारांची बैठक बोलावली आहे. यावेळी लोकसभानिहाय मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.