Baloch rebels attack : बलुच बंडखोरांचाही पाकिस्तानवर ४ ठिकाणी हल्ला; गॅस पाइपलाइन तोडल्या

172

Baloch rebels attack : बलुच बंडखोरांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर हल्ला केला आहे. गेल्या २४ तासांत बलुचांनी पाकिस्तानी सैन्यावर केलेला हा तिसरा मोठा हल्ला आहे. गुरूवारी रात्री पाकिस्तानच्या कुरापतींना भारताने जोरदार प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली त्याचवेळी पाकिस्तान सैन्याच्या कॅम्पवर बलुच आर्मीने हल्ले केल्याचे वृत्त आहे. या हल्यात ४ ठिकाणी स्फोट केल्याचे समजते. काही ठिकाणी गॅस पाइपलाइन तोडल्याचेही समजते आहे. गॅस साठा असलेल्या ठिकाणाला लक्ष्य करण्यात आल्याने तिथे मोठ्या प्रमाणात आग लागल्याचेही समजते आहे. (Baloch rebels attack) बलुच आर्मीने गॅस ऑइल फिल्डवर डेरा बुगती येथे हल्ला केला. डेरा बुगती हे महत्त्वाचे ठिकाण आहे. संपूर्ण पाकिस्तानला येथून गॅस पुरवठा होतो.

याआधीही बोलानमधील माचकुंड येथे बलुच लिबरेशन आर्मीच्या स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉडने पाकिस्तानी लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून हल्ला केला. रिमोट वापरून पाकिस्तानी सैन्याचे वाहन उडवून देण्यात आले. यामध्ये पाकिस्तानी एक अधिकाऱ्यासह ७ सैनिक ठार झाले. पाकिस्तानी सैन्य लष्करी कारवाईची तयारी करत असताना हा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे.

(हेही वाचा – Baloch rebels attack : बलुच बंडखोरांचाही पाकिस्तानवर ४ ठिकाणी हल्ला; गॅस पाइपलाइन तोडल्या )

बीएलएने (BLA) पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला होता, ज्यामध्ये अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते. हा हल्ला केच जिल्ह्यातील किलाग भागात झाला, जिथे पाकिस्तानी सैन्याच्या पथकाला लक्ष्य करण्यात आले.

भारताकडून कराची पोर्ट उद्ध्वस्त

भारताने गुरूवारी रात्री कराचीवर १५ ठिकाणी ड्रोन हल्ले केले. यावेळी केलेल्या हल्यात कराची पोर्ट उद्ध्वस्त झाल्याचे समजते आहे. तसेच रात्री उशिरा पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळांना पून्हा भारताने लक्ष्य केले.

हेही पहा  –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.