गुंतवणूक बादशहा वॉरेन बफे(Warren Buffett) यांनी मोठा निर्णय घेतला असून बर्कशायर हॅथवेच्या सीईओपदावरून निवृत्त होणार आहे. दिग्गज गुंवणूकदार व बर्कशायर हॅथवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले वॉरेन बफे(Warren Buffett) यांनी पदावरून निवृत्त होण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ९४ वर्षीय वॉरेन बफे(Warren Buffett) यांच्याकडे तब्बल १४ लाख कोटींची संपत्ती असून नुकतीच त्यांनी समभागधारकांची बैठक घेतली. या बैठकीतील घोषणेमुळे ४० हजारांहून अधिक उपस्थित गुंतवणूकदारांसह सबंध जगाला आश्चर्याचा धक्का बसला आहे.
दरम्यान, वॉरेन बफे(Warren Buffett) यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर बर्कशायर हॅथवेच्या सीईओपदी कुणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. परंतु, आता १.१६ ट्रिलियन डॉलर मूल्य असलेल्या बर्कशायर हॅथवे कंपनीची धुरा वर्षाच्या अखेरीस ग्रेग एबेल यांच्याकडे असणार आहे. पुढील वर्षापासून ग्रेग एबेल यांच्याकडे कंपनीचे सर्व अधिकार येणार आहेत. निवृत्तीनंतर वॉरेन बफे(Warren Buffett) आता सल्लागार म्हणून कंपनीत कार्यरत राहणार आहेत.
वॉरेन बफे(Warren Buffett) या वर्षाच्या अखेरीस बर्कशायर हॅथवेचे सीईओ पद सोडणार आहेत. कंपनीच्या वार्षिक बैठकीत कंपनीचे सूत्रे उपाध्यक्ष ग्रेग एबेल यांच्या सुपूर्द करण्यात येणार आहेत. उपाध्यक्ष असलेले ग्रेग एबेल सध्या बर्कशायरच्या बिगर विमा व्यवसायाचे नेतृत्व करत आहेत. या कंपनीकडे ३४७.७ अब्ज डॉलरची नगद रक्कम आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे वॉरेन बफे(Warren Buffett) हे त्यांच्याकडील शेअरची विक्री करणार नसून तर ते दान करणार असल्याची माहिती समोर येत आहे.(Warren Buffett)
Join Our WhatsApp Community