Uttan Beach : मान्सून सुरू झाला असून मुंबईलगत असणाऱ्या बीच(Uttan Beach)चा उत्तम पर्याय म्हणजे उत्तन. मुंबई शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या उत्तन बीच(Uttan Beach) नेहमीच पर्यटकांसाठी बेस्ट पर्याय राहिला आहे. पश्चिम किनारपट्टीला लागून असलेला हा परिसर अत्यंत कमी खर्चात उपलब्ध आहे. मुंबईच्या लगत असलेल्या भाईंदर पश्चिमेजवळील उत्तन बीच(Uttan Beach) हे एक शांत आणि नयनरम्य किनारपट्टीचे ठिकाण आहे.(Uttan Beach)
(हेही वाचा Meta AI Video Editing : फेसुबकवर आता एआयच्या मदतीने व्हिडिओही होणार एडिट )
एका दिवसात जाऊन येऊन असे उत्तन बीच पर्यटकांना विरंगुळा म्हणून नेहमीच खुणावते. रोजच्या धावपळीच्या दुनियेत आराम करण्यासाठी, आरामदायी वातावरणात फेरफटका मारण्यासाठी तसेच स्थानिक मासेमारी संस्कृती अनुभविण्यासाठी उत्तन(Uttan Beach) हा उत्तम पर्याय आहे. उत्तनचा समुद्रकिनारा खडकाळ, काळ्या वाळूसह विशेषत्वाने पाहायला मिळतो. आठवड्याच्या शेवटी निवांत, तणावमुक्त वातावरणात पर्यटक नेहमीच येत असतात.
उत्तन बीच(Uttan Beach) नजीक आणखी नयनरम्य ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता. उत्तन बीच(Uttan Beach)सह आपल्याला गोराई बीच आणि ग्लोबल विपश्यना पॅगोडा सारख्या इतर पर्यटन स्थळांना जाता येईल. चला तर मग एकदा तरी उत्तन बीचला भेट देऊया. आणि किनाऱ्यावर आरामदायी फिरण्याचा, निसर्गरम्य सौंदर्याचा आणि शांत वातावरणाचा आनंद घेऊयात. मासेमारी गावातील चैतन्यशील संस्कृतीचा अनुभव घ्या. ज्यात तुम्हाला स्थानिक पाककृती व मासेमारीच्या पारंपरिक पध्दतीचा समावेश आहे.
उत्तन बीच(Uttan Beach)ला कसे पोहोचाल?
उत्तन बीच(Uttan Beach)ला मुंबई लोकलने भाईंदर रेल्वे स्टेशनला उतरून रस्तेमार्गे तुम्हाला पोहोचता येऊ शकते. भाईंदर रेल्वे स्टेशनला उतरून रिक्षा अथवा महानगरपालिका बसने ०९ ते २० मिनिटांत उत्तन बीचला पोहोचू शकता. तसेच, मीरा-भाईंदर महानगरपालिका बसद्वारे उत्तन नाका येथे पोहोचता येईल. बसद्वारे तुम्हाला उत्तन नाका येथे ये-जा करू शकता.(Uttan Beach)
Join Our WhatsApp Community