Shri Kedarnath : ‘हर हर महादेव’चा जयघोष, पहिल्याच दिवशी ३० हजारांहून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन

चारधाम यात्रेतील एक श्रध्दास्थान असलेल्या उत्तराखंडमधील बाबा केदारनाथ धाम(Shri Kedarnath)चे द्वार विधीवत पूजेनंतर भाविकांसाठी खुले करण्यात आले.

29

चारधाम यात्रेतील एक श्रध्दास्थान असलेल्या उत्तराखंडमधील बाबा केदारनाथ धाम(Shri Kedarnath)चे द्वार विधीवत पूजेनंतर भाविकांसाठी खुले करण्यात आले. बाबा केदारनाथ धाम(Shri Kedarnath)चे द्वार उघडल्यानंतर पहिल्याच दिवशी म्हणजे ०२ मे रोजी भाविकांची रीघ पाहायला मिळाली. या भाविकांची संख्या तब्बल ३० हजारांहून अधिक भाविकांनी केदारनाथ धामचं दर्शन घेतले. पहिल्याच दिवशी विक्रमी ३०,१५४ यात्रेकरूंनी बाबा केदारनाथांचे दर्शन घेतले.

(हेही वाचा Kedarnath Dham 2025 : केदारनाथ धामचे दरवाजे उघडले ! मंदिर 10 हजार किलो फुलांनी सजवले )

उत्तराखंडमधील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ३०,१५४ भाविकांनी बाबा केदारनाथां(Shri Kedarnath)चे दर्शन घेतले आहे. यात १९,१९६ पुरूष आणि १०,५९७ महिला व ३६१ मुले यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे बाबा केदारनाथ धाम(Shri Kedarnath)चे द्वार उघडताच भाविकांची मोठी गर्दी झाल्याची माहिती आहे. या गर्दीने केदारनाथ धाम(Shri Kedarnath) परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून निघाल्याचे पाहायला मिळाले.

यात्रा सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, मंदिर समिती, यात्रेकरू पुजारी समुदाय, स्थानिक व्यापारी आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्रितपणे विस्तृत व्यवस्था केली आहे. भाविकांच्या सोयी आणि सुरक्षिततेला प्राधान्य देऊन सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या आहेत.

पहिल्या दिवशी सकाळी ७ वाजता शुभ मुहूर्तावर द्वार खुले

शुक्रवारी केदारनाथ धाम(Shri Kedarnath)चे दरवाजे धार्मिक विधी आणि पूजेसह भाविकांसाठी उघडण्यात आले. भाविकांना आता पुढील सहा महिने बाबा केदारनाथ यांचे दर्शन घेता येईल. शुक्रवारी सकाळी ७ वाजता शुभ मुहूर्तावर विधी आणि मंत्रोच्चाराने जगप्रसिद्ध श्री केदारनाथ धाम(Shri Kedarnath)चे द्वार उघडण्यात आले. मंदिराचे दरवाजे उघडताच हेलिकॉप्टरमधून भाविकांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. द्वार उघडले तेव्हा आर्मी बँडने मधुर गाणी वाजवली. यावेळी, केदारनाथ धाम परिसर भाविकांच्या जयजयकाराने दुमदुमून गेला. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते. याशिवाय केदारनाथ धामचे रावल भीमाशंकर लिंग, मुख्य पुजारी वागेश लिंग, तीर्थ पुरोहित, बीकेटीसीसीचे अधिकारी, स्थानिकांसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.(Shri Kedarnath)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.