Shiv Temple : थायलंड-कंबोडिया यांच्यात ६३ वर्षांपासून वाद सुरू असलेल्या ९०० वर्षे (Shiv Temple) एका सैनिकाच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ११ व्या शतकातील शिव मंदिर(Shiv Temple) युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे. दरम्यान, दोन्ही देशांमधील दीर्घकाळ चाललेल्या तणावादरम्यान बुधवार, २८ मे २०२५ यादिवशी कंबोडियन आणि थाई सैनिकांमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.
कंबोडियन आणि थाई सैनिकांमध्ये मोराकोट कम्यूनच्या चोम झान जिल्ह्यातील टेको मोराकोट गावात झालेल्या चकमकीत एका कंबोडियन सैनिकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अलीकडेच थायलंड आणि कंबोडियामध्ये सीमावर्ती भागांबाबत वाद निर्माण झाला होता. दोन्ही देश या भूभागावर दावा करत असून सांस्कृतिकदृष्ट्या हे ठिकाण उभय देशांसाठी खूप महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे येथेच ९०० वर्षे जुने प्राचीन हिंदू मंदिर(Shiv Temple) आहे.
(हेही वाचा Bihar Assembly Election : निवडणुकीपूर्वीच नितीश कुमार यांचा मास्टरस्ट्रोक; एनडीए सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय )
या हिंदू मंदिरात शिवलिंग स्थापित असून हे मंदिर(Shiv Temple) प्रेह विहार प्रांतात आहे. दोन्ही देशांतील गोळीबारसंदर्भात महिती देण्यात आली आहे. हा गोळीबार चिथावणीखोर नव्हता असे कंबोडियन संरक्षण मंत्रालयाने म्हटले. तसेच, ज्याठिकाणी बराच काळ कब्जा करण्यात आला होता त्याठिकाणी आम्ही हल्ला केला, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर, कंबोडियन सैनिकांनी केलेल्या गोळीबाराला आम्ही प्रत्युत्तर दिल्याचे रॉयल थाई आर्मीने सांगितले.
आहे की हा चिथावणीखोर हल्ला नव्हता. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, थाई सैनिकांनी कंबोडियन सैन्याने ज्या ठिकाणी बराच काळ कब्जा केला होता त्या ठिकाणी हल्ला केला. त्याच वेळी, रॉयल थाई आर्मीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की कंबोडियन सैनिकांनी गोळीबार सुरू केला होता आणि त्यांनी प्रत्युत्तर दिले. देशाच्या स्वसंरक्षण आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणाकरिता प्रत्युत्तरात्मक गोळीबार आवश्यक होता. तसेच, सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे थायलंडचे संरक्षण मंत्री फुमथम वेचायचाई यांनी सांगितले.(Shiv Temple)
Join Our WhatsApp Community