Republic of Balochistan : स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी होत असताना आता #Republic of Balochistan ट्रेंडिंगवर

Republic of Balochistan : बलुचिस्तान प्रजासत्ताकच्या स्वातंत्र्याची घोषणा करतानाचा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी होत असताना आता #RepublicofBalochistan असा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

103

Republic of Balochistan : बलुचिस्तान प्रजासत्ताकच्या स्वातंत्र्याची घोषणा करतानाचा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी होत असताना आता #RepublicofBalochistan असा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. दरम्यान, बलुचिस्तानचे नागरिक दीर्घकाळापासून स्वतंत्र राष्ट्राची मागणी करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानपासून स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून अधोरेखित होत आहे.

बलुच हक्कांचे समर्थक मीर यार बलोच यांनी ‘एक्स’वर अनेक पोस्ट शेअर करून ही घोषणा केली. भारत सरकारला नवी दिल्लीत बलुच दूतावास सुरू करण्याची परवानगी देण्याची विनंतीदेखील केल्याचे समोर आले. तसेच, त्यांनी पाकिस्तानी सैन्याला या प्रदेशातून माघार घेण्यास सांगितले. दहशतवादी पाकिस्तानचा नाश जवळ आला असल्याने लवकरच एक संभाव्य घोषणा केली पाहिजे. आम्ही आमचे स्वातंत्र्य घोषित केले असून आम्ही भारताला बलुचिस्तानचे अधिकृत कार्यालय आणि दिल्लीतील दूतावास सुरू करण्याची विनंती करतो,” असे दि. ०९ मे रोजी लिहिलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

(हेही वाचा Make in India : शत्रूंच्या ड्रोन स्वार्मला भारताचं ‘भार्गवस्त्र’ पुरून उरणार, काउंटर-ड्रोन सिस्टिमची यशस्वी चाचणी )

महत्त्वाचे म्हणजे बलुचिस्तानचे नागरिक बऱ्याच काळापासून पाकिस्तानी राज्यावर पद्धतशीरपणे दुर्लक्षित केल्याचा आरोप करत आहेत. वायू आणि खनिजांसारख्या नैसर्गिक संसाधनांद्वारे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देऊनही, बलुचिस्तान अविकसित आहे. शिक्षण, आरोग्यसेवा आणि पायाभूत सुविधांमध्ये मर्यादित प्रवेश असल्याचेही त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्याच्या घोषणेनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर “रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान” ट्रेंड होत आहे.

बलुचिस्तानने संयुक्त राष्ट्रांना मान्यता देण्यासाठी आणि संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांची बैठक बोलावण्यासाठी पाठिंबा देण्याची विनंती देखील केली. आम्ही संयुक्त राष्ट्रांना बलुचिस्तानच्या लोकशाही प्रजासत्ताकाच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याची आणि मान्यता मिळावी यासाठी सर्व संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांची बैठक बोलावण्याची विनंती करतो. चलन आणि पासपोर्ट छपाईसाठी अब्जावधी निधीची तरतूद केली पाहिजे, असा सूर बलुच आर्मीने आळविला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.