Raigad : मुरूड, अलिबाग, श्रीवर्धन किनारपट्टी पर्यटकांनी बहरली

उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकण(Raigad Tourism) किनारपट्टी नेहमीच पर्यटकांनी बहरून जाते. सध्या शाळा आणि कॉलेजना उन्हाळी सुट्टी असल्याने महानगरातील कुटुंबे निवांत वेळ घालविण्यासाठी पर्यटनस्थळांना भेट देत असतात.

39

उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकण(Raigad) किनारपट्टी नेहमीच पर्यटकांनी बहरून जाते. सध्या शाळा आणि कॉलेजना उन्हाळी सुट्टी असल्याने महानगरातील कुटुंबे निवांत वेळ घालविण्यासाठी पर्यटनस्थळांना भेट देत असतात. यंदा मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक यांसारख्या महानगरांतून मोठ्या संख्येने पर्यटक रायगडच्या(Raigad) प्रसिध्द समुद्रकिनाऱ्यांना भेट देत असल्याचे दिसून आले आहे. विशेषतः मुरूड, अलिबाग, दिवेआगर, श्रीवर्धन, नांदगाव यांसारख्या किनाऱ्यांवर पर्यटकांचा अधिक ओढा राहिला आहे. समुद्रकिनाऱ्यावर सकाळ ते संध्याकाळ पर्यटकांनी मोठी गर्दी केली असून रोजच्या दगदगीपासून दूर निवांत वेळ घालविताना दिसत आहेत.

(हेही वाचा Gold Rate : सोनं १९ हजारांनी स्वस्त होणार?, बाजारतज्ज्ञ काय म्हणाले जाणून घ्या )

रायगड(Raigad) जिल्ह्यातील हॉटेल्स आणि कॉटेजेस पूर्णपणे पर्यटकांनी भरून गेले आहेत. विशेष म्हणजे वाढत्या पर्यटकांमुळे सर्व प्रकारची निवास व्यवस्था, जसे की हॉटेल्स, कॉटेजेस, रिसॉर्ट्स, फार्महाऊस आणि होम-स्टे, जवळपास पूर्णपणे आरक्षित झाली आहेत. किनारपट्टीवर जलक्रीडा (Water Sports), उंट सफारी, घोडागाडी आणि एटीव्ही बाईक राईड मनोरंजनासाठी उपलब्ध विविध पर्यायांचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहेत. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे (Raigad) जिल्ह्यातील पर्यटनासह स्थानिक व्यवसायांनादेखील चालना मिळत आहे.(Raigad)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.