Operation Sindoor :    भारतीय सेनेने पुरावे देऊनही कर्नाटक काँग्रेस आमदाराने ओकली गरळ; म्हणाले….

Operation Sindoor :   भारताने 'Operation Sindoor' अंतर्गत कारवाई करत पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्याचे समोर आले. त्यानंतर आता विरोधकांकडून Operation Sindoor बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. काँग्रेसचे आमदार कोथूर मंजुनाथ यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ऑपरेशन सिंदूर हा फ्कत एक ढोंग होता. काहीही झालेले नाही.

76

Operation Sindoor :   भारताने ‘Operation Sindoor’ अंतर्गत कारवाई करत पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्याचे समोर आले. त्यानंतर आता विरोधकांकडून Operation Sindoor बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. काँग्रेसचे आमदार कोथूर मंजुनाथ यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ऑपरेशन सिंदूर हा फ्कत एक ढोंग होता. काहीही झालेले नाही. फक्त दिखाव्यासाठी तीन-चार विमाने पाठविण्यात आली आणि नंतर परत बोलावण्यात आली, असे वादग्रस्त वक्ततव्य कोथूर मंजुनाथ यांनी केले.

(हेही वाचा पाकचे पंतप्रधान Shahbaz Sharif म्हणाले; आम्ही शांततेसाठी चर्चा करण्यास तयार; भारतानेही जाहीर केली भूमिका )

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजुनाथ यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. हल्ल्यात मारले गेलेले २६-२८ लोकांना न्याय मिळेल का?, त्यांचे दुःख कमी होईल का?, असा सवाल विचारणाऱ्या काँग्रेस आमदारांना भारतीय सैन्यदलांवर विश्वास नाही का, असा प्रतिसवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.

तिन्ही सैन्यदलांकडून पत्रकार परिषद घेत माहिती

Operation Sindoor अंतर्गत भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानातील ०९ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले असून १००हून अधिक दहशवाद्यांना ठार केले. भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाई बहावलपूर, मुरीदके या एअरबेसना लक्ष्य करण्यात आले होते. यासंदर्भात तिन्ही सैन्यदलाने पत्रकार परिषद घेत यासंदर्भात संपूर्ण माहिती दिली. त्यामुळे काँग्रेस आमदाराकडून देशवासीयांची दिशाभूल करण्यात येत आहे.

काँग्रेस आमदारांनी नेमकं काय म्हटले?

Operation Sindoor हा फक्त एक ढोंग होता. काहीही झाले नाही. फक्त दिखाव्यासाठी, तीन-चार विमाने पाठवण्यात आली आणि नंतर परत बोलावण्यात आली. यासोबतच पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी देखील केंद्र सरकारच्या भूमिकेवर आक्षेप घेतल्याचे पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उदित राज यांनाही या मिशनच्या नावाबाबत समस्या होत्या. ऑपरेशन सिंदूरचे नाव काहीतरी वेगळे असायला हवे होते कारण ते एका विशिष्ट धर्माचा संदर्भ देते, असे विधान त्यांनी केले होते. याशिवाय काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनीही विचारले होते की ऑपरेशन सिंदूरमध्ये सर्व दहशतवादी मारले गेले का? आणि मोदी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करू शकतील का?

सैन्याला प्रश्न का विचारायचा?

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. दहशतवाद्यांनी सर्व लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर आणि ते मुस्लिम नसल्याची पुष्टी केल्यानंतर त्यांना निर्घृणपणे ठार मारले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतेक हिंदू पर्यटक होते जे देशातील वेगवेगळ्या राज्यांमधून काश्मीरला गेले होते.Operation Sindoor

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.