Mumbai Metro Line 3 Update : सोमवार, २६ मे रोजी मुंबईतील पहिल्याच पावसात रस्ते, रेल्वे आणि मेट्रोसेवेला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले होते. यात मेट्रो लाईन(Mumbai Metro Line 3) मुसळधार पावसाने विस्कळीत झाली होती. आरे जेव्हीएलआर आणि वरळी दरम्यान धावणाऱ्या मेट्रो लाईन ३ मधील प्रवाशांना असुविधेचा सामना करावा लागला. दरम्यान, आता मेट्रो लाईन ३(अॅक्वा लाईन)ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई मेट्रो ३च्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट करण्यात आली आहे.(Mumbai Metro Line 3)
(हेही वाचा ‘पाकिस्तानवर भरवसा ठेवता येणार नाही, BSF सज्ज आणि सतर्क’; आयजी म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरनंतर…” )
विशेष म्हणजे नव्याने उद्घाटन झालेल्या भूमिगत मेट्रो लाईनने सकाळी ६:३० ते रात्री १०:३० पर्यंत मेट्रो नियमित वेळापत्रकानुसार सुरू असल्याची घोषणा केली आहे. प्रवाशांना नेहमीप्रमाणे प्रवास सुरू ठेवण्याची विनंती केली. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन(एमएमआरसी)ने मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर या मार्गावरील सेवा स्पष्ट केल्या आहेत.
All services from #AareyJVLR to #Worli stations are running smoothly on regular timings from 6:30 AM to 10:30 PM. Passengers are requested to travel as usual. 🚇
#MumbaiMetro #TravelUpdate #AquaLine #मुंबईमेट्रो #MumbaiRains
— MumbaiMetro3 (@MumbaiMetro3) May 27, 2025
मुंबई मेट्रो ३ ने पोस्टमध्ये काय म्हटलं?
मुंबई मेट्रो ३च्या अधिकृत ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे की, आरे जेव्हीएलआर ते वरळी स्थानकादरम्यान सर्व सेवा सकाळी ०६:३० ते रात्री १०:३० पर्यंत नियमित वेळेनुसार सुरळीत सुरू आहेत. प्रवाशांना नेहमीप्रमाणे प्रवास करण्याची विनंती मुंबई मेट्रो ३ कडून करण्यात आली आहे. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे नवीन कार्यरत मार्गावरील काही असुरक्षितता उघडकीस आल्या होत्या. बीकेसी-वरळी मार्गावर असलेल्या आचार्य अत्रे स्टेशनवर एक मोठी घटना घडली होती.
Newly inaugurated Worli underground metro station of Aqua line 3 submerged in water this morning. #MumbaiRain pic.twitter.com/D0gwopOXBE
— Tejas Joshi (@tej_as_f) May 26, 2025
सरंक्षक भिंत कोसळल्याने मेट्रो ३ ची सेवा झाली होती ठप्प
२६ मे रोजी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने आचार्य अत्रे चौक स्थानकानजीकची एक संरक्षक भिंत कोसळली होती. यामुळे भुयारी स्थानकात पाणी शिरल्याचे मेट्रो प्रशासनाने म्हटले होते. या स्थानकाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने सध्या तेथून पाणी येऊ नये म्हणून तात्पुरती संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरु होते. अंदाजित वेळेच्या आधीच पाऊस आल्याने ही भिंत खचून पडली. त्यानंतर मेट्रो प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून वरळी ते आचार्य अत्रे चौक येथील मेट्रो वाहतूक तात्पुरती थांबविली होती.
कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ चा पहिला टप्पा बीकेसी ते आरे कॉलनी सुरु झाल्यानंतर दुसरा टप्पा भाग १ बीकेसी ते वरळीतील आचार्य अत्रे चौक स्थानकात पाणी शिरल्याने यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. या स्थानकातील प्रवाशांनी मेट्रोच्या स्थानकात भरलेल्या पाण्याचे फोटो समाजमाध्यमात व्हायरल केल्यानंतर ‘एमएमआरडीए’ आणि ‘एमएमआरसीएल’ने मेट्रो ३चे ऑपरेशन स्थगित केले होते.(Mumbai Metro Line 3)
Join Our WhatsApp Community