ISI एजंटने भारतातील हेरांना कोणतं काम दिले होतं?, दोघांतील संभाषण तपास यंत्रणांच्या हाती, वाचा संपूर्ण बातमी

ऑपरेशन सिंदूरबाबतची माहिती शत्रू राष्ट्राच्या आयएसआय(ISI) एजंटला देणाऱ्या भारतातील हेरांचा पर्दाफाश करण्यात आला असून अनेक हेरांना पकडण्यात आले आहे. यापैकी एक असलेल्या नोमान इलाही याला पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय(ISI)चा एजंट इकबाल काना याने केल्याचे समोर आले आहे.

45

ऑपरेशन सिंदूरबाबतची माहिती शत्रू राष्ट्राच्या आयएसआय(ISI) एजंटला देणाऱ्या भारतातील हेरांचा पर्दाफाश करण्यात आला असून अनेक हेरांना पकडण्यात आले आहे. यापैकी एक असलेल्या नोमान इलाही याला पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय(ISI)चा एजंट इकबाल काना याने केल्याचे समोर आले आहे. हेर नोमान इलाही आणि आयएसआय एजंट इकबाल काना यांच्यातील संभाषण व्हायरल झाले आहे. या कॉलमध्ये नोमानला अमृतसर मार्गे जम्मू-काश्मीरकडे येणाऱ्या एक्सप्रेसचे लोकेशन पाठव आणि किती लोक प्रवास करतात याबाबतची माहिती (ISI)एजंट इकबाल काना मागत असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे इकबालला माहिती दिल्यानंतर नोमानने व्हिडीओ कॉलचे संभाषण डिलीट करून टाकले.

(हेही वाचा Operation Sindoor : ​​राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष पाकिस्तानची भाषा बोलत आहेत का? भाजपाचा हल्लाबोल )

नोमान इलाही आणि आयएसआय(ISI) एजंट इकबालमध्ये काय बोलणं झालं?

पोलिसांच्या तपासातून नोमान इलाही हा पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय(ISI)च्या संपर्कात होता. तसेच, तो आयएसआयचा एजंट इकबाल कानाच्या संपर्कात होता. नोमान आणि इकबाल यांच्यातील एक चॅट आणि ऑडिओ कॉल संभाषणही तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत.

माध्यमांच्या रिपोर्टनुसार दोघांमधील संवाद पुढीलप्रमाणे : –

नोमान – साहेब प्लीज मला माफ करा. माझी काय चूक आहे? तुम्ही माझ्या पाठिशी आहात.

इकबाल – तू माझं काम करणार आहेस का? आता कधी काम करणार तू? लष्कराचे दोन फोटो दे.

नोमान – मला फक्त दोन दिवस द्या.

इकबाल – काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये.

नोमान – ठीक आहे.

इकबाल – गुड.

मागील काही दिवसांत भारतीय गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानशी कनेक्शन असलेल्यांचा मागोवा घेतला असून ऑपरेशन सिंदूरच्या विजयाचा जल्लोष साजरा करत असतानाच दुसरीकडे, भारतातील हेरांच्या अटकसत्रामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. भारतीय तपास यंत्रणांनी आतापर्यंत ११ हेरांना अटक केली असून या लोकांच्या माध्यमातून भारतातील विविध ठिकाणांची व लष्करी तळांची रेकी करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. (ISI)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.