Iran-Israel War : इराण-इस्त्रायल युध्द(Iran-Israel War) पेटलेले असताना आता इराणचे निर्वासित युवराज रेजा पहलवी यांनी इराणी सैन्याला बंड करण्याचे आणि लोकांना उठण्याचे आवाहन केले आहे. युवराज रेजा पहलवी यांनी लष्कर व नागरिकांना इस्लामिक रिपब्लिकविरुद्ध बंड करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी देशव्यापी संप आणि निदर्शने करण्याचे आवाहन केले असून इराणला युद्धा(Iran-Israel War)त ओढण्याचा व नागरिकांना विश्वासघात करण्याचा आरोपही केला आहे.(Iran-Israel War)
(हेही वाचा Israel-Iran war : भारताने व्यक्त केली चिंता; आमचे परिस्थितीवर लक्ष )
दरम्यान, इराणी लष्कर व अणवस्त्र ठिकाणांवर इस्रायली हल्ल्यांनंतर निर्वासित युवराज रेजा पहलवी तसेच कट्टरपंथीयांनी हे आवाहन केले होते. महत्त्वाचे म्हणजे इस्त्रायली सुरक्षा दला(Iran-Israel War)ने केलेल्या हल्ल्यात काही वरिष्ठ राजेशाही अधिकारी व अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू झाला. तसेच, इराणी सरकारने एका निवेदनात म्हटले की, प्रतिशोध हा केवळ आमचा हक्क नाही, तो अपरिहार्य आहे. आम्ही इस्रायलने केलेले उल्लंघन अक्षम्य गुन्हा मानतो. असे सांगतानाच इराणकडून प्रत्युत्तराची भाषा केली जात आहे. तर दुसरीकडे, इराणी लोकांना स्वातंत्र्याशिवाय दुसरे काहीही नकोय. ही मुल्ला राजवट क्रांतीने संपेल, असेही निर्वासित युवराज रेजा पहलवी म्हणाले.
(हेही वाचा Israel Iran Conflict : भारतीय हवाईसेवेवर परिणाम; एअर इंडियाचे विमान अर्ध्यातूनच परतले )
इराण-इस्त्रायलचा इतिहास काय सांगतो?
क्राउन किंगचे वडील शाह मोहम्मद रेजा पहलवी यांच्या कारकिर्दीत इराण इस्रायलचा जवळचा मित्र होता. या क्रांतीमुळे सध्याची राजवट, एक कट्टरपंथी धर्मशाही, ज्याला मुल्लांचे राज्य, म्हणजेच शिया धर्मगुरूंचे राज्य असेही म्हणतात, सत्तेत आली. त्या राजवटीने इस्रायलवर युद्ध लादले आहे. तसेच, इस्त्रायलचे पंतप्रधान म्हणाले, तुमचा स्वातंत्र्याचा दिवस जवळ आला आहे. १३ जून रोजी सकाळी, पहलवी यांनी इस्रायलशी झालेल्या संघर्षा(Iran-Israel War)साठी राजवटीला जबाबदार धरले. इराणी नागरिकांना रस्त्यावर निदर्शने व देशव्यापी संपांद्वारे इस्लामिक रिपब्लिक उलथवून टाकण्याचे आवाहन पंतप्रधान नेत्यानाहू यांनी केले.
इस्त्रायल पंतप्रधान नेत्यानाहू काय म्हणाले?
नेतान्याहू असेही म्हणाले की, इराणवर हल्ला करण्याचे प्राथमिक ध्येय त्याच्या अस्तित्वाला असलेल्या धोक्याला निष्प्रभ करणे आहे. त्यांनी असेही सांगितले की तेहरानमध्ये इराणने अण्वस्त्रे विकसित करण्याचे प्रयत्न इतके वाढविले आहेत की ते त्या ध्येयापासून फार लांब नाहीत.(Iran-Israel War)
Join Our WhatsApp Community