IMD Monsoon Update : राज्यातील विविध भागांत यलो तर विदर्भाला ऑरेंज अलर्ट जारी

IMD Monsoon Update : राज्यात मान्सूनची यंदा लवकरच इंट्री होणार असून पोषक वातावरण निर्मिती झाली आहे. अंदमानात मान्सूनला पोषक वातावरण तयार झाले असून जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यात मान्सूनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांत ढगाळ वातावरण, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशार हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

67

(हेही वाचा Sitaram Gupta ED Raids : वसई-विरारमधील ४१ अनधिकृत इमारतीप्रकरणी ईडीची धडक कारवाई )

दरम्यान, हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील विविध भागांना यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर, पुढील चार दिवस राज्यावर अवकाळी पावसाचे सावट कायम राहणार आहे. विशेष म्हणजे मान्सून पर्व सुरू होण्याआधी राज्यावर अवकाळी पावसाचे संकट उभे ठाकले आहे. मागील काही दिवसांत राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस पडला तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वारा व गारपिटीची नोंद झाली.

भारतीय हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना इशारा

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये विजांच्या कडकडाटासह, वादळी वारे आणि मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर तिकडे विदर्भात गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या भागांत दि. १४ आणि दि. १५ मे रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.IMD Monsoon Update

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.