IDF : इस्त्रायली सुरक्षा दलाकडून भारताचा चुकीचा नकाशा पोस्ट, चूक कळताच मागितली माफी

इस्त्रायली सुरक्षा दला(IDF)ने भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेचा चुकीचा नकाशा सोशल मीडियावरील अधिकृत अकाऊंटवरून पोस्ट केला. पोस्टमधील चूक लक्षात आल्यानंतर इस्त्रायली सुरक्षा दला(IDF)ने भारताची माफी मागितल्याचे समोर आले.

88

इस्त्रायली सुरक्षा दला(IDF)ने भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेचा चुकीचा नकाशा सोशल मीडियावरील अधिकृत अकाऊंटवरून पोस्ट केला. पोस्टमधील चूक लक्षात आल्यानंतर इस्त्रायली सुरक्षा दला(IDF)ने भारताची माफी मागितल्याचे समोर आले. इस्त्रायली सुरक्षा दला(IDF)ने पोस्ट केलेल्या नकाशात जम्मू व काश्मीरचा भाग पाकिस्तानात दाखविण्यात आला होता. या चुकीनंतर इस्त्रायली सुरक्षा दलाने आपली चूक मान्य करत भारताची माफी मागितली.(IDF)

(हेही वाचा ‘आसाममध्ये शांतता बिघडविणाऱ्या धर्मांधांना दिसताच क्षणी गोळ्या घाला’; मुख्यमंत्री Himanta Biswa Sarma यांचे पोलिसांना सख्त आदेश )

 

दरम्यान, इस्त्रायली सुरक्षा दला(IDF)च्या पोस्टनंतर भारतीय युजर्सनी पोस्टच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त करत इस्त्रायली सैन्याला पोस्ट हटविण्यास सांगितले. पोस्ट केल्यानंतर ९० मिनिटांनी इस्त्रायली सैन्याने माफी मागत स्पष्टीकरण दिले. एका भारतीय युझर्सने एक्सवर पोस्ट करत इस्त्रायली सैन्याला उत्तर दिले.

केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद नाही

भारताने अनेक वेळा स्पष्ट केले आहे की, पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तरादाखल केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हीच भावना व्यक्त केली होती. इस्रायलने पोस्ट केलेल्या नकाशावर केंद्र सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

इराण आणि इस्रायलमध्ये तणाव वाढला

इराण व इस्रायलमध्ये युद्ध सुरू झाले असून इराणची अणुऊर्जा रोखण्यासाठी इस्रायल(IDF)ने शुक्रवारी हल्ला केला. इस्रायलने इराणवर ड्रोन व क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यानंतर इराणनेही चोख प्रत्युत्तर दिले. त्याच वेळी, इराण इस्रायलवर सतत हल्ला करत आहे. इराणने तेल अवीवपासून जेरुसलेमपर्यंत क्षेपणास्त्रे डागली आहेत.(IDF)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.