FundKaveriEngine : मागील दिवसांपासून सोशल मीडियावर #FundKaveriEngine ट्रेंड सुरू असल्याचे समोर आले आहे. या सोशल मीडियावर फंड कावेरी इंजिन ट्रेंड करत असून याची चाचणी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना(डीआरडीओ)कडून करण्यात येत आहे. याच कावेरी इंजिनची रशियामध्ये चाचणी सुरू असून युसीएव्ही विमानात बसविण्यात येणार आहे.(FundKaveriEngine)
दरम्यान, भारताच्या स्वदेशी फायटर इंजिन प्रोग्राम ‘कावेरी’ला अधिक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नेटिझन्स करत आहेत. यासंदर्भात, एक सकारात्मक बातमी समोर आली असून हे इंजिन भारताच्या स्टेल्थ अटॅक ड्रोन युसीएव्ही(अनमॅन कॉम्बॅट एरिअल व्हेईकल)मध्ये बसविले जाणार आहे. यूसीएव्ही व्यतिरिक्त भारताच्या पाचव्या पिढीतील स्वदेशी विमान एलसीए तेजसमध्ये एकत्रित करण्याची योजना आखत आहे.
(हेही वाचा Elon Musk : शक्तिशाली रॉकेट स्टारशिपची 9वी चाचणी अयशस्वी ! पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच … )
एएनआयच्या वृत्तानुसार, कावेरी इंजिनची डीआरडीओकडून रशियामध्ये चाचणी सुरू करण्यात येत आहे. तसेच, कावेरी इंजिनची आणखी २५ तास चाचणी बाकी आहे. युसीएव्ही भारतात तयार केले जात असून ते लवकरच अंतिम टप्प्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे रशियन एजन्सींनी कावेरी इंजिनची चाचणी घेण्यासाठी स्लॉटदेखील प्रदान केले आहेत.
अहवालात नमूद करण्यात आले आहे की, रशियाची राजधानी मॉस्कोनजीक एका चाचणी सुविधेत कावेरी इंजिनची चाचणी केली जात आहे. येथेच हे इंजिन आयएल-७६ कार्गो विमानात बसविण्यात येत आहे. इंजिनाची वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर चाचणी करण्यात येत आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.(#FundKaveriEngine)
Join Our WhatsApp Community