Mumbai Weather : राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली असून मंगळवारी संध्याकाळपासून मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसा(Mumbai Weather)ने मुंबईतील पश्चिम उपनगरात अंधेरी सबवे पाण्याखाली गेला होता. दोन ते तीन फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सबवे बंद झाल्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यामुळे कामावरून घरी निघालेल्या मुंबईकरांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
(हेही वाचा Powai Lake मधील जलपर्णी काढण्यासाठी तात्काळ अतिरिक्त मशिन्ससह मनुष्यबळ )
वेरवली-विलवडे दरम्यान दरड कोसळल्याने कोकण रेल्वे विस्कळीत
कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे विस्कळीत झाली. वेरवली-विलवडे स्टेशन दरम्यान दरड कोसळल्याने कोकण रेल्वे ठप्प झाली. संध्याकाळच्या सुमारास अतिपावसाने दरड कोसळल्याने अप-डाऊन दोन्ही मार्गावर रेल्वे गाड्या थांबविण्यात आल्या. गोव्याच्या दिशेने नेत्रावती एक्सप्रेस रत्नागिरीत थांबून असून मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्सप्रेसही वैभववाडीत तर मुंबईकडे जाणारी तेजस एक्सप्रेस कणकवलीमध्ये थांबविण्यात आली आहे.
पुढचे चार दिवस अरबी समुद्र खवळणार; मच्छीमारांना सतर्कतेचं आवाहन
राज्यात सर्वत्र अवकाळी पाऊस पडत असून मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा(Mumbai Weather) इशारा देण्यात आला असून रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघर येथील समुद्रकिनारी दि. २२ ते २४ मे दरम्यान समुद्र खवळण्याची शक्यता असून मच्छिमारांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून या काळात खोल समुद्रात मासेमारी करणे टाळावे, असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.(Mumbai Weather)
Join Our WhatsApp Community