अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांना त्यांच्या आजोबांचे जन्म प्रमाणपत्र चक्क भेट दिल्याचे समोर आले आहे. जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांनी ओव्हल ऑफिसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांची भेट घेतली. या भेटीत चान्सलर मर्झ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सोनेरी फ्रेम केलेले त्यांच्या आजोबांचे जन्म प्रमाणपत्र भेट म्हणून दिले. डोनाल्ड ट्रम्प यांचे आजोबा जर्मनीत जन्मले होते त्यानंतर ते अमेरिकेत स्थलांतरित झाले होते.(Donald Trump)
(हेही वाचा Indus Water Treaty : एक-एक थेंब पाण्यासाठी तडफडताहेत! भारताच्या वॉटर स्ट्राईकने पाकिस्तानला कंठशोष )
दरम्यान, जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट आता चांगलीच चर्चेत आली आहे. अनपेक्षित भेटीबाबत बोलताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प(Donald Trump) म्हणाले, हे आजोबांचे जन्म प्रमाणपत्र आहे. १८६९ मध्ये ब्रँडनबर्गजवळ जन्मले, त्यांचे पहिले नाव फ्रेडरिक होते असे सांगतानाच ते पुढे म्हणाले, या प्रमाणपत्राबद्दल तुमचे(जर्मन चान्सलर) खूप खूप आभार मानू इच्छितो. मला माहित नाही, कदाचित आपण… आपण ते कुठेतरी लावू शकतो, असेही ट्रम्प(Donald Trump) यावेळी म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump)-फ्रेडरिक मर्झ यांची भेट
Germany’s Chancellor Merz presented Trump the birth certificate of his German grandfather, Friedrich Trump.
It was a clever jab to remind Trump he’s a German immigrant. pic.twitter.com/uTTDQ8sfAT
— Anonymous (@YourAnonCentral) June 5, 2025
व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या मैत्रीपूर्ण भेटीत डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) आणि फ्रेडरिक मर्झ यांच्यात यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. या भेटीत युक्रेन, व्यापार आणि सैन्याबद्दल चर्चा करण्यात आली. परंतु, इतर परदेशी नेत्यांच्या ओव्हल ऑफिस भेटींमध्ये दिसणारी आतषबाजीचा यावेळी समावेश नव्हता. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांनी जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ नेतृत्वाचे कौतुक केले. ते म्हणाले की, अमेरिकन सैन्य जर्मनीतच राहील. त्यासोबतच, संरक्षणावरील खर्च वाढवियांच्याण्याच्या बर्लिनच्या वचनबद्धतेचे अमेरिका स्वागत करते, असेही त्यांनी सांगितले.(Donald Trump)
Join Our WhatsApp Community