dadar railway station : मुंबईकरांच्या गर्दीत सदैव गजबजलेल्या दादर रेल्वे स्टेशनचा इतिहास जाणून घ्या

dadar railway station :    मुंबई लोकल प्रवासातील सर्वात गजबजलेले स्टेशन म्हणजे दादर. याच दादर रेल्वे स्टेशन(dadar railway station)चा इतिहासदेखील फार जुना असाच. तर १६०० च्या दशकाच्या सुरुवातीला तत्कालीन मुंबई हे माहीमच्या विस्तारित भाग म्हणून दादर सुरू झाले होते. त्या काळात आजच्या मुंबईतील बहुतेक परिसर अस्तित्वात देखील नव्हता.

35

dadar railway station :    मुंबई लोकल प्रवासातील सर्वात गजबजलेले स्टेशन म्हणजे दादर. याच दादर रेल्वे स्टेशन(dadar railway station)चा इतिहासदेखील फार जुना असाच. तर १६०० च्या दशकाच्या सुरुवातीला तत्कालीन मुंबई हे माहीमच्या विस्तारित भाग म्हणून दादर सुरू झाले होते. त्या काळात आजच्या मुंबईतील बहुतेक परिसर अस्तित्वात देखील नव्हता. अनेक शतकांच्या स्थित्यंतरानंतर मुंबई शहरातील लोकसंख्या वाढ आणि नवीन घरांच्या गरजेमुळे दादर एक वस्ती म्हणून उदयास येऊ लागले. आजही मुंबईतील सुसंस्कृत आणि उच्चभ्रू म्हणून या भागाकडे पाहिले जाते.(dadar railway station)

(हेही वाचा Tripura Floods : त्रिपुरात सततच्या पावसामुळे हाहाकार, तब्बल १,३०० कुटुंबांचं स्थलांतरण, मुख्यमंत्री म्हणाले… )

१९व्या शतकात स्थापन झालेले दादर रेल्वे स्थानक(dadar railway station) हे मुंबईतील सर्वात जुन्या स्थानकांपैकी एक आहे. शहराच्या एका प्रमुख व्यावसायिक केंद्राच्या उदयासह शहराचे विस्तारीकरण झाल्यानंतर भागात लोकवस्तीस सुरू झाली. त्यानंतर या भागातून लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा देखील सुरू झाल्या. विशेष म्हणजे, सुरुवातीला लोकल गाड्यांपासून ते एक महत्त्वाचे केंद्र बनले.

आजमितीस, दादर रेल्वे स्थानक (Dadar Railway Station) मुंबई शहरामधील एक महत्त्वाचे आणि वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गांवर असून येथून उपनगरीय रेल्वेच्या गाड्या धावतात. तसेच, अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या देखील दादरहून सुटतात. ज्यात मुंबईहून पुणे, वडोदरा आणि नाशिककडे जाणारी गाड्यांचा समावेश आहे. दादर रेल्वे स्थानकाला ‘दादर’ हे नाव कशाप्रकारे प्राप्त झाले, याबाबत अनेक मान्यता आहेत.

दादर हे नाव कसे पडले?

दादर रेल्वे स्थानकाचा इतिहास १८व्या शतकापासून सुरू झाला. दादर रेल्वे स्थानक १८६८ मध्ये बांधले गेले. ‘दादर’ या शब्दाचा अर्थ मराठीत ‘बंधारणा’ किंवा ‘पूल’ असा होतो. काही जाणकारांच्या म्हणण्यानुसार, माहिम बेट आणि परळ बेटाला जोडणाऱ्या बंधाऱ्याला दादर असे म्हटले जात होते. यावरून या भागाला दादर असे नाव दिले गेले. तर काहीजण असेही म्हणतात की, दादर(dadar railway station)मधून जाणाऱ्या दोन रेल्वे ट्रॅकमुळे तेथे दोन भाग निर्माण झाले होते आणि त्या भागाला ‘दादर’ असे म्हटले जात होते.(dadar railway station)

दादर हे मुंबई उपनगरी रेल्वेचे एक प्रमुख स्थानक आहे आणि ते भारतीय रेल्वेसाठी देखील एक टर्मिनल आहे. दादर हे मुंबईतील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. दादर स्थानक मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे दोन्ही मार्गांवर आहे. दादर रेल्वे स्थानक मुंबई शहराच्या रेल्वे इतिहासाचा एक अविभाज्य भाग असून शहर आणि आसपासच्या भागातील प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.