Covid JN.1 Varient : भारतात नव्या व्हेरिएंटचे २५७ रुग्ण; काय आहे देश-विदेशातील सद्यस्थिती जाणून घ्या

Covid JN.1 Varient :  कोविड-१९ चे रुग्ण पुन्हा एकदा समोर आले असून जगभरात नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही नवे व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले असून २५७ रुग्ण अॅक्टिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. कोविड-१९चा नवा प्रकार JN.1 चे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने आशियातही नव्या व्हेरिएंटचा वेगाने पसरत आहे.

95

Covid JN.1 Varient :  कोविड-१९ चे रुग्ण पुन्हा एकदा समोर आले असून जगभरात नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही नवे व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले असून २५७ रुग्ण अॅक्टिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. कोविड-१९चा नवा प्रकार JN.1 चे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने आशियातही नव्या व्हेरिएंटचा वेगाने पसरत आहे. दरम्यान, भारतातील सद्यस्थितीत पाहता कोविड-१९च्या नव्या व्हेरिएंटला घाबरण्याची गरज नाही, असे देशभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी याआधीच स्पष्ट केले आहे.

थायलंडमध्ये सर्वाधिक रुग्ण, ब्रिटनमध्ये सर्वाधिक मृत्यू

माध्यमांच्या वृत्तानुसार, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सिंगापूरमध्ये कोरोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या ११,१०० होती, जी मे २०२५ च्या सुरुवातीला १४,००० पेक्षा जास्त झाली. इंडिया टुडेच्या अहवालानुसार, थायलंडच्या आपत्ती नियंत्रण विभागाने म्हटले की, दि. ११ मे ते १७ मे दरम्यान थायलंडमध्ये ३३,०३० रुग्णांची नोंद झाली असून यापैकी किमान ६,००० रुग्ण फक्त बँकॉकमध्ये आढळल्याचे दिसून आले.

(हेही वाचा ‘Operation Sindoor’मध्ये ३ हजार अग्निवीरांची महत्त्वाची भूमिका; “पाकिस्तानी क्षेपणास्त्र आणि ड्रोन…” )

त्याचप्रमाणे, हाँगकाँगमध्ये, ६ एप्रिलनंतर फक्त चार आठवड्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्येत १३.६ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे आढळून आले. तर आशिया वगळता, ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांची सर्वात भयावह आहे. दि. ०२ मे रोजी कोविड-१९ मुळे १०१ रुग्णांचा मृत्यू झाला असून जानेवारीमध्ये एका आठवड्यात १११ जणांना जीव गमवावा लागल्याचे ब्रिटन सरकारच्या ताज्या आकडेवारीवरून दिसून आले.

भारतातही कोविड-१९ नव्या व्हेरिएंटचे २५७ रुग्ण

भारतातील कोविडच्या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णसंख्येचे प्रमाण कमी आहे. त्याचबरोबर, भारतातील सद्यस्थिती नॉर्मल असून घाबरू नका, असे वैद्यकीय तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले. देशातील रुग्णसंख्येवर नजर टाकल्यास, भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते, सध्या भारतात कोरोना विषाणूचे २५७ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ५३ रुग्ण मुंबईत अॅक्टिव्ह आहेत.

माध्यमांच्या वृत्तानुसार, बुधवार, २१ मे २०२५ पर्यंत केरळमध्ये सर्वाधिक ९५ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर तामिळनाडूमध्ये ६६, महाराष्ट्रात ५६ आणि कर्नाटकात १३ रुग्ण आढळले आहेत. या सर्वांसह, पुद्दुचेरीमधून १०, गुजरातमधून ७, दिल्लीतून ५, राजस्थानमधून २ आणि हरियाणा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममधून प्रत्येकी १ नवीन रुग्ण आढळले आहेत.(Covid JN.1 Varient)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.