यंदाच्या पावसाळ्यात बाहेर फिरण्याकरिता पुणे शहरात (best hill stations near pune) पर्यटनस्थळ शोधताय तर तुमच्यासाठी एक खास पर्याय उपलब्ध आहे. तो पर्याय म्हणजे महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील एक सुंदर आणि निसर्गरम्य पर्वतीय रस्ता ताम्हिणी घाट. पावसाळा सुरू झाला की बऱ्याच पर्यटकांची पावले ताम्हिणी घाटाच्या दिशेने वळू लागतात. ताम्हिणी घाटाकडे जाण्याकरिता तुम्ही जर रेल्वेने जात असाल तर पुणे रेल्वे स्टेशन(best hill stations near pune) जवळ ठरु शकते. तसेच, जर तुम्ही रस्त्याने जाणार असाल तर हा घाट पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर, मुळशी आणि ताम्हिणी या दोन शहरांदरम्यान आहे.
विशेष म्हणजे पश्चिम घाटात वसलेला ताम्हिणी घाट निसर्गप्रेमी आणि साहसी पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. विशेषतः पावसाळ्यात घाट परिसरातील आल्हाददायक वातावरण, येथील हिरवेगार लँडस्केप, धबधबे आणि ट्रेकिंग ट्रेल्सदेखील तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. पुणे आणि मुंबईहून सहज पोहोचता येणारे आणि ताम्हिणी धबधबा आणि मुळशी धरण यांचा समावेश पर्यटनामध्ये अवश्य केला जातो. त्याचबरोबर, पक्षी निरीक्षणासाठी तर हे ठिकाण जणू पर्वणीच!
ताम्हिणी घाटाला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ कोणता?
तुम्ही जर ताम्हिणी घाटात पर्यटनाकरिता जात असाल तर जून ते सप्टेंबर या काळात अतिशय उपयुक्त ठरेल. या काळात, हा प्रदेश आल्हाददायी वातावरणाने, ओसंडून वाहणारे धबधबे, घाटमाथ्यावरील हिरवळ आणि धुक्याने झाकलेले पर्वत असं जादुई वातावरण याठिकाणी पाहायला मिळतं. उलटपक्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात निरभ्र आकाश ट्रेकिंग आणि बाह्य क्रियाकलापांसाठी हा एक उत्तम काळ मानला जातो.
साहसिक पर्यटनात ट्रेकिंग, राफ्टिंग आणि सायकलिंग सारख्या साहसी खेळांचा अनुभव पर्यटकांना ताम्हिणी घाटात घेता येतो. जवळच असलेले मुळशी धरण आणि तलाव हे इतर प्रमुख आकर्षणे आहेत, जे पिकनिक आणि फोटोग्राफीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन ठरतात. हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेले हे तलाव विरंगुळा म्हणून येणाऱ्या पर्यटकांसाठी एक शांत वातावरण देऊ करते. चला मग आगामी मान्सून पर्वात शहरी धकाधकीच्या जीवनापासून थोडंदूर आपणास हिरवागार परिसर व एक नयनरम्य पर्वतीय खिंड म्हणून निसर्गप्रेमी आणि साहसी पर्यटकांसाठी एक आवडतं हिल स्टेशन वा पर्यटनस्थळ बनला आहे.(best hill stations near pune)
Join Our WhatsApp Community