Ahmedabad Plane Crash : विमान दुर्घटनेनंतर बोईंग कंपनीच्या समभागात मोठी घसरण; ‘गुंतवणूकदारांना…’

Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमधील विमान दुर्घटने(Ahmedabad Plane Crash)नंतर बोईंगसह अन्य विमान कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले. अहमदाबाद विमान अपघाता(Ahmedabad Plane Crash)चा फटका भारत ते अमेरिकेपर्यंत बसल्याचे पाहायला मिळाले.

110

Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमधील विमान दुर्घटने(Ahmedabad Plane Crash)नंतर बोईंगसह अन्य विमान कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले. अहमदाबाद विमान अपघाता(Ahmedabad Plane Crash)चा फटका भारत ते अमेरिकेपर्यंत बसल्याचे पाहायला मिळाले. एअर इंडियाचं बोईंग ७८७-८ विमानाच्या अपघाता(Ahmedabad Plane Crash)नंतर बोईंग विमान कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. विशेष म्हणजे, बोईंग कंपनीसह इंडिगो व स्पाईसजेट यांसारख्या विमान कंपन्यांच्या समभागातही घसरण झाल्याचे दिसून आले.(Ahmedabad Plane Crash)

(हेही वाचा Bangladeshi Infiltrator : ‘ऑपरेशन पुशबॅक’ अंतर्गत घुसखोऱ्यांविरोधातील कारवाईला वेग; दिल्लीत नेमकी काय परिस्थिती? )

दरम्यान, अहमदाबादमधील भीषण विमान अपघाता(Ahmedabad Plane Crash)नंतर बोईंगच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे. महत्त्वाचे म्हणजे, बुधवार, ११ जूनला बोईंग कंपनी समभाग ०.८ टक्क्यांपेक्षा जास्त घसरणीसह २१४ डॉलरवर बंद झाला होता. तसेच, मागील ३ दिवसांपासून कंपनीच्या समभागात घसरण दिसून आली. तर तीन महिन्यांत समभागात वाढ दिसून आल्यानंतर एका अपघाताने समभागात घसरण पाहायला मिळाली.

 

अहमदाबादहून लंडनच्या दिशेने निघालेल्या बोईंग ७८७-८ प्रवासी विमान अपघाताचा परिणाम भारतासहित अमेरिकेच्या शेअर बाजारावरही पाहायला मिळाला. विशेषतः बोईंग विमान कंपनीच्या समभागांचा विचार करता, अमेरिकन शेअर बाजारात बोईंगच्या शेअर्समध्ये तब्बल ०९ टक्क्यांची घसरण दिसून आली. गुरुवार, १२ जूनला दुपारी ३:२६ वाजता कंपनीचे शेअर्स ८ टक्क्यांहून अधिक घसरणीसह सुमारे १९७ डॉलर प्रति शेअरवर व्यवहार करत होते.

विमान अपघाताबाबत कंपनीचे विधान

अहमदाबाद विमान अपघातानंतर बोईंगचे शेअर्स घसरले. अपघाताबाबत कंपनीचे विधानही समोर आले. बोईंगने म्हटले आहे की अहमदाबादमधील विमान अपघाताच्या सुरुवातीच्या अहवालांची त्यांना माहिती घेतली असून अपघातासंदर्भात अधिक तपशील गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे बोईंग विमान कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले.(Ahmedabad Plane Crash)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.