केवळ कोळसा खाणीच नाही…; जागतिक स्तरावर Adani Groupने केला महत्त्वाचा करार

भारतातील प्रसिध्द उद्योगसमूह Adani Groupने आता महत्त्वाचा करार केला आहे. याकरारासह ऑस्ट्रेलियातील कोळसा खाणीच नाही तर आता सागरी बंदरेही अदानी समूह हाताळणार आहे.

67

भारतातील प्रसिध्द उद्योगसमूह Adani Groupने आता महत्त्वाचा करार केला आहे. याकरारासह ऑस्ट्रेलियातील कोळसा खाणीच नाही तर आता सागरी बंदरेही अदानी समूह हाताळणार आहे. अदानी समूहाचा सिंगापूर कंपनीसोबत करार झाला असून रोख रकमेऐवजी शेअर्समध्ये यावेळी व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे.

(हेही वाचा Mock Drill : मुंबईत पुढील पाच दिवस ‘ऑपरेशन अभ्यास’ )

अदानी समूहातील हा करार १७,२४४ कोटी रुपयांचा असून रोख रकमेऐवजी शेअर्सच्या देवाणघेवाणीद्रवारे करार करण्यात आला आहे. या कराराकरिता शेअर खरेदी आणि सबस्क्रिप्शन करारावर दि. १७ एप्रिल २०२५ रोजी स्वाक्षरी करण्यात आली. दरम्यान, एफडीआय-ओडीआय शेअर स्वॅप पूर्ण झाला असून अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने सिंगापूरमधील कार्माइकल रेल अँड पोर्ट सिंगापूर होल्डिंग्जकडून अॅबॉट पॉइंट पोर्ट होल्डिंग्जमधील १००% हिस्सा विकत घेतला आहे.

अहवालांनुसार, या करारासाठी शेअर खरेदी आणि सबस्क्रिप्शन करार १७ एप्रिल २०२५ रोजी स्वाक्षरी करण्यात आला होता. परंतु, त्यासाठी नियामक आणि शेअरहोल्डरची मान्यता पूर्ण करणे आवश्यक आहे. या अधिग्रहणामुळे अदानी पोर्ट्सची जागतिक स्तरावरील व्यावसायिकतेस बळकटी प्राप्त होईल. कारण अॅबॉट पॉइंट पोर्ट हे ऑस्ट्रेलियातील उत्तर क्वीन्सलँडमधील एक प्रमुख निर्यात टर्मिनल आहे.Adani Group

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.