बॉलिवूड अभिनेता Aamir Khan पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आगामी ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच आमिर खानची देशभक्ती उफाळून आल्याने सोशल मीडियावर विशेषतः ट्विटरवर #BoycottAamirKhan आणि #BoycottSitareZameenPar या ट्रेंड होताना दिसून येत आहे. नेटिझन्सकडून आमिर खानच्या ट्रेलरवर बहिष्कार घालण्याची मागणी करण्यात येत असून देशद्रोही, पहलगाम ते ऑपरेशन सिंदूर दरम्यान तो कुठे होता?, अशी विचारणाही Aamir Khanला करण्यात येत आहे.
(हेही वाचा “काही अपवादात्मक ठिकाणी महायुती…”: महापालिका निवडणुकांसंदर्भात मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचं मोठं विधान )
दरम्यान, दि. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्यदलाने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यावेळी बॉलीवूड अन्य कलाकारांनी भारताच्या कारवाई स्वागत केलं होतं. त्यानंतर आता १ आठवडा उलटून गेल्यानंतर आमिर खानने ऑपरेशनसंदर्भात ट्विट केले. या ट्विटवर अनेकांनी कमेंट्स केल्या असून त्याला ‘बनावट देशभक्तीचा’ पुरावा असे म्हटले आहे.
विशेष म्हणजे भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरवर मौन बाळगल्याचा आरोप आमिर खानवर होत आहे. एक्स वापरकर्त्यांनी त्याला त्याच्या ‘बनावट देशभक्तीचा’ पुरावा म्हटले. विशेषतः चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्याने दाखवलेल्या देशभक्तीनंतर ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘ऑपरेशन सिंदूर’वरील मौन व्रत तोडले. या चित्रपटापूर्वी आमिर खानवर पुन्हा एकदा बहिष्कार टाकण्याचे आवाहन नेटिझन्सकडून करण्यात आले आहे.Aamir Khan
Join Our WhatsApp Community