Vikhroli Railway Station : विक्रोळी रेल्‍वे स्‍थानकाजवळील उड्डाणपुलाचे केवळ ५ टक्‍के काम राहिले शिल्लक

443
Vikhroli Railway Station : विक्रोळी रेल्‍वे स्‍थानकाजवळील उड्डाणपुलाचे केवळ ५ टक्‍के काम राहिले शिल्लक
Vikhroli Railway Station : विक्रोळी रेल्‍वे स्‍थानकाजवळील उड्डाणपुलाचे केवळ ५ टक्‍के काम राहिले शिल्लक
  • मुंबई (विशेष प्रतिनिधी)

विक्रोळी रेल्‍वे स्‍थानकाजवळील (Vikhroli Railway Station) उड्डाणपुलाचे बांधकाम ९५ टक्‍के काम पूर्ण झाले असून पुलाची उर्वरित कामे दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्‍याचे नियोजन आहे, अशी माहिती अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर (Abhijeet Bangar) यांनी दिली.

विक्रोळी पूर्व-पश्चिम जोडणारा विक्रोळी रेल्‍वे स्थानकावरील उड्डाणपूल या प्रकल्‍पांची अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर (Abhijeet Bangar) यांनी शुक्रवारी २५ एप्रिल २०२५ रोजी पाहणी केली. तसेच, आवश्‍यक ते निर्देश दिले. प्रमुख अभियंता (पूल) उत्‍तम श्रोते यांच्‍यासह संबंधित अधिकारी, वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी (Police officer) यावेळी उपस्थित होते.

(हेही वाचा – kala jamun health benefits: नैसर्गिक औषधी फळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळ्या जांभळांचे आरोग्यदायी फायदे काय? जाणून घ्या)

बांगर यांनी विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ (Vikhroli Railway Station) मध्य रेल्वे मार्गावर उभारण्यात येत असलेल्या पुलाची पाहणी केली. या पुलाची एकूण रुंदी १२ मीटर तर लांबी ६१५ मीटर इतकी आहे. त्यापैकी ५६५ मीटरची उभारणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) केली आहे. या पुलावर टाकण्यात आलेल्‍या तुळया (गर्डर) सुमारे २५ मेट्रिक टन इतक्या वजनाच्या आहेत. या तुळयांची लांबी २५ ते ३० मीटर इतकी आहे. पुलाच्या तीन टप्प्यांत ह्या तुळया (गर्डर) टाकण्यात आल्‍या आहेत. प्रत्येक टप्प्यात ६ अशाप्रकारे तीन टप्प्यांत एकूण १८ तुळया टाकण्यात आल्‍या आहेत. पुलाच्या एकूण १९ स्तंभांपैकी पूर्वकडील बाजूस १२ तर पश्चिमेकडील बाजूस ७ स्तंभ उभारले आहेत. या संपूर्ण कामाची अभिजीत बांगर यांनी पाहणी केली.

(हेही वाचा – CC Road : रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिट कामांमध्ये चक्क नंतर केले जाते गटाराचे बांधकाम; महापालिकेच्या अभियंत्यांना हे मान्य आहे का?)

विक्रोळी रेल्वे स्थानक (Vikhroli Railway Station) उड्डाणपुलाचे ९५ टक्‍के काम पूर्ण झाले आहे. त्‍यात पूर्व बाजूकडील तसेच रेल्वे हद्दीतील काम, पश्चिम बाजूकडील चढ – उतार मार्ग आदींचा समावेश आहे. विक्रोळी पुलाचे पूर्व बाजूकडील तसेच रेल्वे हद्दीतील काम पूर्ण झाले आहे. पश्चिम बाजूकडील चढ – उतार मार्ग तयार आहेत. पश्चिम बाजूला सेंट जोसेफ शाळेजवळ वळण आहे. त्या ठिकाणी पुलाचे ३ स्पॅनवरील काम शिल्लक आहे. त्यावर ‘डेक स्लॅब’ टाकण्यात येणार आहे. हे काम अभियांत्रिकीदृष्ट्या आव्हानात्मक आहे. शाळा आणि रेल्वे स्थानक असे सातत्याने रहदारी असलेले परिसर जवळ असल्याने अतिशय दक्षता घेत मात्र मुंबई महानगरपालिका (BMC) या ठिकाणी काम करत आहे. हे काम ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण करावे. त्याचबरोबर संपूर्ण पुलावर क्रॅश बॅरियर, ध्वनिरोधक, कठडे, रंगकाम, थर्मोप्लास्ट, कॅट आईज, विद्युत खांब, दिशादर्शक फलक आदी कामेदेखील समांतरपणे पूर्ण करावीत, जेणेकरून उड्डाणपूल पावसाळ्यापूर्वी नागरिकांसाठी खुला करता येईल, असे निर्देश बांगर यांनी दिले.

पूर्व आणि पश्चिम परिसरांना जोडणारा हा पूल पूर्ण झाल्यानंतर पूर्व द्रुतगती महामार्गावरून पवईकडे जाणाऱ्या वाहनधारकांच्‍या वेळ आणि इंधनात बचत होणार आहे. तसेच घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग रेल्वे स्थानकापासून ५ किलोमीटरपर्यंतच्या परिघातील वाहनधारकांनाही या पुलाचा उपयोग होणार असल्‍याचे अभिजीत बांगर (Abhijeet Bangar) यांनी नमूद केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.