चिपळूणहून रत्नागिरीकडे (Ratnagiri Accident ) जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स गाडीला CNG गॅसने भरलेल्या टँकरने जोरदार धडक दिल्याने एक गंभीर अपघात झाला आहे. मुंबई-रत्नागिरी- गोवा महामार्गावर असलेल्या निवळी येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात काही प्रवासी देखील जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. (Ratnagiri Accident )
या अपघातात LPG टँकरमधून गॅस लीक होत असल्याचे समोर आले असून बाव नदीजवळील काही घरांना आग लागल्याची घटना घडली आहे. तर, या आगीत दोन गाड्या आणि एक गोठा जळून खाक झाला आहे. सोबतच गोठयातील जनावर ही जखमी झाले आहेत. आंब्याची कलम देखील जळून खाक झाली आहेत. घराजवळ उभी असलेली रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली आहे व घरावरील फायबरचे पत्रे पेटले आहेत. (Ratnagiri Accident )
हेही वाचा- जर्मनीतल्या उद्योजकांसाठी महाराष्ट्राच्या MIDC मध्ये 500 एकर भूखंड राखीव : Uday Samant
सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास बावनदी परिसरात ही दुर्घटना घडली. चिपळूणहून रत्नागिरीकडे निघालेली मिनी बस (वडाप) निवळी गावाजवळ असताना, मागून भरधाव वेगात आलेल्या गॅस टँकरने बसला जोरदार धडक दिली. धडकेनंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मिनी बस थेट दरीत कोसळली. (Ratnagiri Accident )
धडकेनंतर टँकरमधून गॅसची गळती होऊ लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने प्रशासनाला याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल व रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले असून, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Ratnagiri Accident )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community