Mumbai Railway Accident : धक्कादायक ! घाटकोपरमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू !

113
Mumbai Railway Accident : धक्कादायक ! घाटकोपरमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू !
Mumbai Railway Accident : धक्कादायक ! घाटकोपरमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू !

मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या (Mumbai Railway Accident ) प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या मोकळ्या जागेत अडकून प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. मुंब्रा येथील लोकलमधून पडून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच घाटकोपर रेल्वे स्टेशनवर ही दुर्घटना घडली आहे. (Mumbai Railway Accident )

नेमकं काय घडलं ?
मृत व्यक्तीचा तोल गेला. यानंतर तो प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या जागेत अडकला. त्याला बाहेर काढल्यानंतर तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं होतं. शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घाटकोपरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर ही घटना घडल्याचं उघड झालं आहे. उपचारासाठी या व्यक्तीला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Mumbai Railway Accident )

हेही वाचा- CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा जन्मदिवस देशी गोवंश संवर्धन दिवस म्हणुन साजरा होणार ; महायुती सरकारचा निर्णय

मात्र, गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मृत प्रवासी बदलापूरचा रहिवाशी असून तो अंध असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Mumbai Railway Accident )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.