Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या गर्दीने घेतला जवानाचा जीव! ट्रेनमध्ये धक्काबुक्की झाली आणि …

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या गर्दीने घेतला जवानाचा जीव! ट्रेनमध्ये धक्काबुक्की झाली आणि ...

279
Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या गर्दीने घेतला जवानाचा जीव! ट्रेनमध्ये धक्काबुक्की झाली आणि ...
Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या गर्दीने घेतला जवानाचा जीव! ट्रेनमध्ये धक्काबुक्की झाली आणि ...

गर्दीच्या रेट्यामुळे धावत्या लोकलमधून (Mumbai Local Accident) पडून महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. गणेश जगदाळे असं या मयत जवानाचं नाव आहे. ते 31 वर्षीय दहिसर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. (Mumbai Local Accident)

हेही वाचा-Pakistan Earthquake : पाकिस्तान सततच्या भूकंपाच्या धक्क्याने हादरला!

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ते ड्युटी संपवून दहिसर स्थानकातून नायगावला (Mumbai Local Accident) जाण्यासाठी लोकल पकडली. मात्र प्रचंड गर्दीमुळे ते दरवाज्याजवळ उभे असताना धक्काबुक्की झाली आणि ते सरळ रुळावर पडले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यामुळे त्यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (Mumbai Local Accident)

हेही वाचा- Cyclone Shakti Alert: अरबी समुद्रात घोंघावतेय ‘शक्ती’ चक्रीवादळ! ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा!

गणवेश आणि ओळखपत्रावरुन गणेश जगदाळे यांची ओळख पटवण्यात आली. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. रेल्वे पोलिसांनी त्यांना कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (Mumbai Local Accident)

हेही वाचा- Cough Syrup Death : २ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका; केंद्र सरकारचा सल्ला

मुंबई लोकलची गर्दी विभागण्यासाठी लोकल फेऱ्या वाढवणे, दरवाजे बंद लोकल चालवणे, कार्यालयीन वेळा बदलणे, स्वस्त आणि जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणे अशा अनेक पर्यायांवर चर्चा होत असतात, मात्र प्रत्यक्षात उपाययोजना होताना दिसत नाहीत. यामुळे धावत्या लोकलमधून प्रवासी पडून होणाऱ्या घटना कायम आहेत. (Mumbai Local Accident)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.