Monsoon Update : मुसळधार पावसाने मुंबई लोकल मंदावली ; वाचा सविस्तर माहिती …

Monsoon Update : मुसळधार पावसाने मुंबई लोकल मंदावली ; वाचा सविस्तर माहिती ...

301
Monsoon Update : मुसळधार पावसाने मुंबई लोकल मंदावली ; वाचा सविस्तर माहिती ...
Monsoon Update : मुसळधार पावसाने मुंबई लोकल मंदावली ; वाचा सविस्तर माहिती ...

मान्सून (Monsoon Update) यंदा १२ दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मे महिन्यातच राज्यात मान्सून येण्याची ही १६ वर्षांतील पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढील २४ तासांमध्ये मान्सून रविवारी चक्क तळकोकणात पोहोचला आहे. कर्नाटक आणि संपूर्ण गोवा राज्यातही त्याने धडक दिली. पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून संपूर्ण मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Monsoon Update)

हेही वाचा-Monsoon Update : १६ वर्षांत पहिल्यांदाच १२ दिवस आधी मान्सून केरळमध्ये दाखल ; तामिळनाडू, कर्नाटकला रेड अलर्ट

मात्र मान्सूनपूर्व पावसाने मुंबईतील वाहतूक मंदावली आहे. मध्य रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. पुढील 3 तासांत मुंबई आणि उपनगरीय भागात मध्यम पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. यासह पुढील 3 तासांत 50-60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह मध्यम ते तीव्र पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. (Monsoon Update)

 

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर कल्याणच्या दिशेने जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक 15 मिनिटे उशिराने सुरु आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनच्या दिशेने येणारी जलद वाहतूक 10 मिनिटे उशिराने सुरु आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील 15 मिनिटं उशिराने सुरु आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक 7-8 मिनिटं उशिराने सुरू आहे. माटुंगा, दादर, वरळी, लालबागमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरात देखील पावसाचा जोर वाढला आहे. वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसरमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. (Monsoon Update)

भांडूप, घाटकोपर, ठाण्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. नवी मुंबईतही जोरदार पाऊस पडतआहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र व लगतच्या मराठवाड्याच्या भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील चार दिवसांत कोकण, गोव्यातील बहुतांश भागात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Monsoon Update)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.