Megablock : रविवारी मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक ; वेळापत्रक पाहून बाहेर पडा …

Megablock : रविवारी मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक ; वेळापत्रक पाहून बाहेर पडा ...

122
Megablock : रविवारी मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक ; वेळापत्रक पाहून बाहेर पडा ...
Megablock : रविवारी मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक ; वेळापत्रक पाहून बाहेर पडा ...

मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दिनांक ०१.६.२०२५ रोजी उपनगरीय विभागांत विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक (Megablock ) घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाउन धीम्या सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. (Megablock )

हेही वाचा-Mithi River मधील गाळाच्या विल्हेवाटीसाठी कंत्राटदारांनी शोधले नवीन डम्पिंग ग्राऊंड, महापे ऐवजी मुंब्य्रात लागणार विल्हेवाट

घाटकोपर येथून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ पर्यंत विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर चालवल्या जातील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील. (Megablock )

हेही वाचा- Corona : “कोविड पेशंटला मारुन टाक…” ; लातूरच्या वरिष्ठ डॉक्टरची ऑडिओ क्लिप व्हायरल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलला जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ पर्यंत वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. (Megablock )

हेही वाचा- Turkish Airlines सोबतचा करार रद्द करा ! भारत सरकारने इंडिगोला दिला 3 महिन्यांचा अल्टिमेटम

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या अप हार्बर लाईन सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते संध्याकाळी ४.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या अप हार्बर लाईन सेवा बंद राहतील. ब्लॉक काळात पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. (Megablock )

हेही वाचा- Exam : विद्यार्थ्यांनो तयारीला लागा; आरोग्य विद्यापीठाची ‘या’ तारखेला होणार पीएच. डी. सामाईक प्रवेश परीक्षा

ब्लॉक काळात हार्बर लाईनवरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे. (Megablock )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.