Maharashtra EV Policy 2025 : एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी ?

Maharashtra EV Policy 2025 : एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी ?

108
Maharashtra EV Policy 2025 : एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी ?
Maharashtra EV Policy 2025 : एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी ?

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोल माफ (Maharashtra EV Policy 2025) करण्याचा विचार महाराष्ट्र सरकार करत आहे, अशी माहिती राज्य सचिवालयातील सूत्रांनी दिली. राज्यात ईव्हींचा हिस्सा 25% पर्यंत नेण्यासाठी ही महत्त्वाची पावले उचलली जात असून, ही नवीन ईव्ही धोरणातील एक महत्त्वाची तरतूद आहे. (Maharashtra EV Policy 2025)

हेही वाचा-Cashless Treatment : अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार होणार ; आरोग्य खात्याचा मोठा निर्णय

परिवहन विभागाने मांडलेला हा प्रस्ताव आर्थिक व इतर विभागांकडून मंजुरीनंतर मंत्रिमंडळात मंजूर होण्याची शक्यता असून, 1 मे 2025 पासून ही योजना लागू होऊ शकते. या सवलतीचा उद्देश वाहतुकीच्या प्रमुख मार्गांवर इलेक्ट्रिक व्हेईकलचा वापर प्रोत्साहित करणे असा असून, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व समृद्धी महामार्ग हे अत्यंत महत्त्वाचे व वाहतुकीने गजबजलेले मार्ग आहेत. (Maharashtra EV Policy 2025)

हेही वाचा- Nashik Satpir Dargah : नाशिक काठे गल्लीतील कट्टरपंथींचा पोलिसांवरील हल्ला पूर्वनियोजित ; पोलिसांचे शिक्कामोर्तब ! राजकीय कनेक्शन उघड

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) ने नुकतीच माहिती दिली की मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोल दर एप्रिल 2030 पर्यंत वाढवले जाणार नाहीत. मात्र, जुना मुंबई-पुणे महामार्गावरील टोल एप्रिल 2026 पासून वाढवला जाणार आहे. 1 जानेवारी 2025 पर्यंत, महाराष्ट्रात 48.82 दशलक्ष नोंदणीकृत वाहने आहेत, त्यापैकी फक्त 6% ही इलेक्ट्रिक वाहने आहेत, असे महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. (Maharashtra EV Policy 2025)

तुलनात्मक आकडेवारी: (Maharashtra EV Policy 2025)

दिल्ली: 12% ईव्ही वाहने

कर्नाटक: 9%

तामिळनाडू: 8%

हा फरक भरून काढण्यासाठी राज्य सरकारकडून टोल सवलतीसह विविध प्रोत्साहन योजना राबवण्याचे नियोजन आहे. (Maharashtra EV Policy 2025)

हेही पहा-

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.