बापरे! आंतरराष्ट्रीय विमान प्रवासी संख्येत २९१ टक्के वाढ

143
International Air Passengers
बापरे! आंतरराष्ट्रीय विमान प्रवासी संख्येत २९१ टक्के वाढ

कोरोना काळात संपूर्ण जगातले कारभार ठप्प पडले होते. यात सर्वाधिक फटका बसला होता तो विमान प्रवासाला. पण आता हळूहळू चित्र बदलत आहे. एका अहवालानुसार अवघ्या काही वर्षांमध्ये भारतातील हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्यांची संख्या अमेरिका, चीनला मागे टाकणार आहे. या प्रचंड मागणीला सेवा देण्यासाठी भारतीय विमान इंडस्ट्री सज्ज होते आहे. २०२२ – २०२३ चे आकडे त्याच दिशेने खूण करत आहेत. (International Air Passengers)

देशातली सर्वाधिक व्यग्र विमानतळ

भारतात एकूण १३७ विमानतळे आहेत. देशांतर्गत विमानतळांची संख्या १०३ आहे तर २४ आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. सध्याच्या घडीला देशातील सर्व विमानतळांपैकी दिल्लीतले विमानतळे सर्वात व्यग्र मानले जाते. तर कोरोना संकटाआधी हाच मान मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने मिळवला होता.

(हेही वाचा – Potholes Problem : आता अॅपवरून करा खड्ड्यांची तक्रार; बांधकाम विभागाचं नवं अॅप)

प्रवासी संख्येत २९१ टक्के वाढ (International Air Passengers)

२०२२-२०२३ या आर्थिक वर्षात ४.४० कोटी लोकांनी मुंबईच्या विमानतळावरून प्रवास केला. मागच्या वर्षाच्या तुलनेत यात १०५ टक्क्यांची वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा आकडा १ कोटी १० लाख २० आहे. त्याच्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत हा आकडा खूप चांगला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने (मिआल) ही माहिती दिली आहे. (International Air Passengers)

एका दिवसांत इतके प्रवासी!

२०२२-२०२३च्या या एका वर्षाच्या काळात वेगवेगळे बदल झाले आहेत. ११ फेब्रुवारी २०२३ ला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून ९७४ विमानांनी ये-जा केली आहे. तर १० डिसेंबर २०२२ ला सर्वांत जास्त लोकांनी प्रवास केला. त्या एकाच दिवसात तब्बल १ लाख ५० हजार ९८७ प्रवाशांनी प्रवास केला होता. (International Air Passengers)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.