Mumbai Metro 7A चा महत्त्वाचा टप्पा पूर्ण ; सेवा कधी सुरू होणार ?

345
Mumbai Metro 7A चा महत्त्वाचा टप्पा पूर्ण ; सेवा कधी सुरू होणार ?
Mumbai Metro 7A चा महत्त्वाचा टप्पा पूर्ण ; सेवा कधी सुरू होणार ?

मुंबई मेट्रो 7A (Mumbai Metro 7A ) या मार्गिकेवरील महत्त्वाचा बोगदा आज खणून पूर्ण झाला. बोगदा खणून झाल्यामुळे आता या मार्गावर ट्रॅक बसवण्याचे आणि ओव्हरहेड वायर्स लावण्याच्या कामाला सुरुवात करता येणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मेट्रोची 7A (Mumbai Metro 7A) ही मार्गिका कार्यान्वित होऊ शकेल. (Mumbai Metro 7A )

हेही वाचा-“… तर बाळासाहेबांनी लाथच घातली असती” ; Chandrashekhar Bawankule यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

एमएमआरडीएकडून उभारण्यात येत असलेली मुंबई मेट्रो 7A ही मार्गिका गुंदवली ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडण्यासाठी उभारण्यात येत आहे. आज याच मार्गिकेसाठी जे 1.6 किमीचे भूमिगत बोगदे खणण्यात येत आहेत. त्यापैकी एक बोगदा आज खोदून पूर्ण होत आहे. दिशा नावाची टनेल बोरिंग मशिनने हा संपूर्ण बोगदा खणला. याच कामाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. (Mumbai Metro 7A )

प्रकल्पाची सध्याची स्थिती काय ? (Mumbai Metro 7A )
मेट्रो मार्ग ७अ चे काम ५९% पूर्ण झाले आहे. १ सप्टेंबर, २०२३ रोजी डाउनलाइन बोगद्याचे पहिले ड्राइव्ह (TBM मशिन) सुरू केले. या बोगद्याची लांबीः १.६४७ किमी असून लायनिंगसाठी ११८० रिंग्स (१.४ मीटर लांब) बसविण्यात आल्या. बोगद्याचा व्यासः ६.३५ मीटर एवढा असून ६ भागात विशेष डिझाईन असलेल्या प्रिकास्ट रिंग्स वापरण्यात आल्या. सप्टेंबर, 2023 ला TBM मशीन जमिनीपासून 30 मीटर खाली भूगर्भात उतरवण्यात आली. मेट्रो मार्ग ३ च्या वरुन, सहार उन्नत रस्त्यांच्या पायाखालून, मोठ्या सांडपाणी वाहिन्या व जल वाहिन्यांना क्रॉस करून विविध अडचणींवर मात करून दिनांक १७ एप्रिल, २०२५ रोजी TBM (जमिनीवर येणार आहे) ने बोगद्याचा ब्रेक थ्रू यशस्वीरित्या पूर्ण केला. (Mumbai Metro 7A )

एक महत्त्वाचा ऐतिहासिक क्षण (Mumbai Metro 7A )
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये या भूमिगत मेट्रो मार्गिकेला विशेष महत्तव आहे कारण या मार्गिकेमुळे मुंबईकरांना कुलाबा ते वसई-विरार मिरा-भाईंदरपर्यंत मेट्रोचा आरामदायी प्रवास अनुभवता येणार आहे. तसेच विविध मेट्रो मार्गिकेच्या जोडणीमुळे ठाणे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार आहे. सर्व अडचणींवर मात करून मुंबई मेट्रो प्रकल्पांच्या पुढील यशस्वी वाटचालीच्या दृष्टीने हा ब्रेक थ्रू एक महत्त्वाचा ऐतिहासिक क्षण ठरतो. (Mumbai Metro 7A )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.