Central Railway QR Code Service : मेल, एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकासाठी क्यूआर कोड सुरू

Central Railway QR Code Service : मेल, एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकासाठी क्यूआर कोड सुरू

119
Central Railway QR Code Service : मेल, एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकासाठी क्यूआर कोड सुरू
Central Railway QR Code Service : मेल, एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकासाठी क्यूआर कोड सुरू

मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक क्यूआर कोडवरून (Central Railway QR Code Service) जाणून घेण्याची सेवा मध्य रेल्वेने सुरू केली आहे. मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेल येथून सुटणाऱ्या मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकासाठी क्यूआर कोड कार्यान्वित केला आहे. (Central Railway QR Code Service)

हेही वाचा-पाक बिथरला ! PoK मधील मदरशांना 10 दिवसांची सुट्टी ; पाकचे धार्मिक विभागाचे प्रमुख म्हणाले, “नरेंद्र मोदी आणि …”

मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा तपशील जलद व सोयीस्करपणे उपलब्ध व्हावा यासाठी मध्य रेल्वेने क्यूआर कोड आधारित माहिती प्रणाली सुरू केली आहे. यामुळे प्रवाशांना साध्या स्कॅनद्वारे मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रकाची माहिती मिळणार आहे. (Central Railway QR Code Service)

हेही वाचा- Siren system : भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये वाढली भीती, ‘या’ शहरांमध्ये बसवले सायरन सिस्टीम

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेल स्थानकांवर क्यूआर कोड उपलब्ध करून दिले आहेत. या माध्यमातून प्रवाशांना मेल/एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक, प्रवासी आरक्षण प्रणाली नियम, मार्ग नकाशा, मध्य रेल्वेचे अधिकृत संकेतस्थळ, तक्रार निवारण आणि मदतीसाठी रेलमदत पोर्टल आदी माहिती उपलब्ध होईल. (Central Railway QR Code Service)

हेही वाचा- Amit Shah : “हे नरेंद्र मोदींचं सरकार, दहशतवाद्यांना वेचून…” ; अमित शाहांचा पाकड्यांना इशारा

प्रवासी आता स्थानकांवर उपलब्ध असलेला क्यूआर कोड स्कॅन करून पुढील गोष्टी पाहू शकतात :

• मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी ट्रेनचे वेळापत्रक

• प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) नियम

• मार्ग नकाशा

• मध्य रेल्वेचे अधिकृत संकेतस्थळ

• तक्रार निवारण आणि मदतीसाठी रेलमदद पोर्टल

प्रवाशांच्या सोयीसाठी ही माहिती मराठी, इंग्रजी, हिंदी या तीन भाषांमध्ये उपलब्ध आहे. (Central Railway QR Code Service)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.