अहमदाबादमध्ये (Ahmedabad) एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले. यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. (Air India Plane Crashed) या घटनेत जीवितहानी झाली का, याची माहिती अद्याप अधिकृत मिळालेली नाही. हे प्रवासी विमान टेक ऑफ करतानाच कोसळले असल्याचे सांगितले जात आहे. एअर इंडियाचे हे विमान लंडनला जात होते. मात्र त्याआधीच या विमानाचा अपघात झाला.
(हेही वाचा – Shailaja Pujari : राष्ट्रकुल स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक; मात्र ‘ही’ एक चूक पडली महागात)
अहमदाबादमधील मेघानी इथे हे विमान कोसळले आहे. विमान कोसळण्याचं नेमकं कारण काय आहे? हे अद्याप समोर आलेले नाही. काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही दुर्घटना झाली असावी, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.
आता हवाई रुग्णवाहिका म्हणजेच एअर अॅम्बुलन्स (Air ambulance) पोहोचलेली आहे. अहमदाबाबदच्या विमानतळावरही घडामोडी वाढल्या आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. हे विमान रहिवासी भागात कोसळले आहे. विमानात २४२ प्रवासी होते. (Air India Plane Crashed)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community