Accident News : जगबुडी नदीच्या पुलावरून कार 100 फूट खाली कोसळली, 5 जणांचा मृत्यू

Accident News : जगबुडी नदीच्या पुलावरून कार 100 फूट खाली कोसळली, 5 जणांचा मृत्यू

97
Accident News : जगबुडी नदीच्या पुलावरून कार 100 फूट खाली कोसळली, 5 जणांचा मृत्यू
Accident News : जगबुडी नदीच्या पुलावरून कार 100 फूट खाली कोसळली, 5 जणांचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे झालेल्या अपघातात (Accident News) पाच जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर हा अपघात झाला. जगबुडी नदीच्या पुलावरुन कार थेट 100 फूट खाली कोसळली. यामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. (Accident News)

हेही वाचा-India-Pakistan Tensions : भारत विरोध आणि पलायन; पाक सेनापतींची दयनीय अवस्था!

या कारमधील सर्वजण मुंबईतून देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात होते. मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या दुर्घटनेत कारचा चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालायत उपचार सुरु आहेत. (Accident News)

हेही वाचा- Operation Sindoor : दूरदृष्टीने घडलेला बलसागर भारत

पहाटे साधारण पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. कार जगबुडी नदीवरुन जात असताना भरधाव वेगात होती. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून ती 100 ते 150 फूट खाली कोसळली. कार जोरात खाली आदळल्याने कारचा चेंदामेंदा झाला आहे. (Accident News)

हेही वाचा- सैनिकांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या Rahul Gandhi यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी खडसावले

ही कार क्रेनच्या साहाय्याने वर उचलण्यात आली. त्यानंतर कारमधील मृतदेह बाहेर काढण्यात आले. या भीषण दुर्घटनेत कारचा चालक आणि एक प्रवासी गंभीररित्या जखमी झाला आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालायत उपचार सुरु असल्याची माहिती आहे. (Accident News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.