Pune Accident : जेजुरीजवळ स्विफ्ट कार आणि पीकअप टेम्पोचा भीषण अपघात ; 7 जणांचा मृत्यू

Pune Accident : जेजुरीजवळ स्विफ्ट कार आणि पीकअप टेम्पोचा भीषण अपघात ; 7 जणांचा मृत्यू

43
Pune Accident : जेजुरीजवळ स्विफ्ट कार आणि पीकअप टेम्पोचा भीषण अपघात ; 7 जणांचा मृत्यू
Pune Accident : जेजुरीजवळ स्विफ्ट कार आणि पीकअप टेम्पोचा भीषण अपघात ; 7 जणांचा मृत्यू

जेजुरी-मोरगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि पीकअप टेम्पोचा भीषण अपघात (Pune Accident ) झाला आहे. या अपघातात एका महिलेसह 7 जणांचा जागीच मृत्यू तर ५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. मोरगाव रस्त्यावरील एका कंपनी समोर रात्री हा अपघात झाला. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. (Pune Accident )

मृतांची नावे
सोमनाथ रामचंद्र बायसे (21), रामू संजीवन यादव, दोघेही रा नाझरेकप ता.पुरंदर जि.पुणे, अजयकुमार चव्हाण, रा. उत्तर प्रदेश, अजित अशोक जाधव, रा.कांजळे, ता. भोर, पुणे, किरण भारत राऊत रा. पवारबाकी ता. इंदापूर, पुणे, अश्विनी संतोष येसार, रा. नागणसूर हैद्रे सोलापूर, अक्षय शंकर राऊत, रा. झारगडवाडी ता. बारामती, पुणे अशी अपघातील मृतांची नावे आहेत. (Pune Accident )

नेमकं काय घडलं ?
पुण्याहून मोरगावकडे जाणारी स्विफ्ट डिझायर कार (क्र. एम एच 42 ए एक्स 1060) जेजुरीकडून मोरगावकडे जात असताना श्रीराम ढाब्यासमोर पिकअप टेम्पोला ( क्र. एम एच 12 एक्स एम 3694 ) मधील साहित्य खाली करीत असताना जोरदार धडक दिली. येथील रस्त्यावरील एका कंपनी समोरील हॉटेल श्रीराममध्ये पीकअप टेम्पोमधील साहित्य उतरविण्याचे काम सुरू होते. त्यावेळी जेजुरीकडून इंदापूरकडे जाणाऱ्या कारने पीकअप टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात स्विफ्ट कारमधील पाच जण तर पिकअपमध्ये असलेल्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. (Pune Accident )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.