Yuzvendra Chahal ठरला आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज

48
Yuzvendra Chahal ठरला आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज
Yuzvendra Chahal ठरला आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज

पंजाब किंग्सचा (Punjab Kings) फिरकीपटू आणि आयपीएल (IPL) इतिहासातील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) इतिहास घडवला आहे. चहलने २०२५ च्या आयपीएलच्या ४९व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध गोलंदाजी करताना हॅटट्रिक केली आहे. याचसोबत चहल हा आयपीएल २०२५ मध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाजही ठरला. याशिवाय २०२३ पासून आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज आहे.

बुधवारी, ३० एप्रिलला चेपॉक स्टेडियमवर (M. A. Chidambaram Stadium) खेळवल्या जात असलेल्या सामन्यात, चहलने प्रथम गोलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जसाठी १९ व्या षटकात हा अद्भुत पराक्रम केला. या षटकात भारतीय लेग-स्पिनरने ४ विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये एमएस धोनीचा (MS Dhoni) एक आणि हॅट्रिकचा समावेश होता. चहलने १९ व्या षटकाची सुरूवात वाईड बॉलने केली. मग धोनीने पहिल्या लीगल चेंडूवर षटकार मारला. पण इथून चहलने सामन्याचा रोख बदलला आणि स्वत:च्या नावे विक्रमही केला आहे. चहलने (Yuzvendra Chahal) यानंतर दुसऱ्या चेंडूवर धोनीला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत झेलबाद केलं. त्यानंतर दीपक हुडाने (Deepak Hooda) तिसऱ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या.

(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी ! दहशतवादी हाफिज सईदच्या फोटोवर क्रॉस लावला आणि …)

चहलने (Yuzvendra Chahal) यानंतर सलग तीन चेंडूवर हॅटट्रिक घेतली. चौथ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात दीपक हुडा (Deepak Hooda) प्रियांश आर्यकरवी (Priyansh Arya) झेलबाद झाला. पाचव्या चेंडूवर चहलने अंशुल कंबोजला (Anshul Kamboj) क्लीन बोल्ड केलं. तर अखेरच्या चेंडूवर नूर अहमद (Noor Ahmad) मोठा फटका खेळायला गेला आणि यान्सनने त्याला झेलबाद केलं. आणि आयपीएल २०२५ मध्ये हॅटट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. हॅटट्रिक घेताच चहलने त्याची आयकॉनिक पोज देत मैदानात बसला आणि अशारितीने चेन्नईचा डाव १९० धावांवर आटोपण्यात मोठी भूमिका बजावली.

चहलने हॅटट्रिक घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी चहलने २०२३ मध्ये ही कामगिरी केली होती. त्यावेळी राजस्थान रॉयल्सचा भाग असलेल्या चहलने (Yuzvendra Chahal) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती. यासह, तो आयपीएलमध्ये एकापेक्षा जास्त हॅटट्रिक घेणाऱ्या मोजक्या गोलंदाजांमध्ये सामील झाला. यामध्ये अमित मिश्रा, युवराज सिंग आणि रोहित शर्मा सारखी नावे आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.