
-
ऋजुता लुकतुके
आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी लॉर्ड्सवर सध्या सुरू आहे. पहिल्या दोन दिवसांवर गोलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं आहे. आफ्रिकन संघ १३७ धावांत सर्वबाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात अवस्था ८ गडी बाद १४४ अशी झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे २१८ धावांची आघाडी तर आहे. पण, ८ गडीही बाद झाले आहेत. मूळातच या कसोटीत पहिल्या दोन दिवसांत २४ गडी बाद झाले आहेत. कसोटीचे आणखी ३ दिवस बाकी असले तरी खेळपट्टीचं स्वरुप पाहता तिसऱ्याच दिवशी निकालाची शक्यता आहे. (WTC Final)
इंग्लंडमधील हवामान लहरी असतंच. आणि ही खेळपट्टी त्यानुसार आपले रंग बदलत आहे. थोडं जरी ढगाळ वातावरण असेल तरी खेळपट्टीवर चेंडूला अनियमित स्विंग मिळत आहे. आणि परिणामी चेंडू खेळणं फलंदाजांना कठीण जात आहे. ऑस्ट्रेलियाने (Australia) पहिल्या डावांत २१२ धावा केल्यानंतर आफ्रिकन संघाला १३७ धावांतच गुंडाळलं. त्यामुळे ७५ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी ऑस्ट्रेलियाला मिळाली. ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) २८ धावांत ६ बळी मिळवले. तर आफ्रिकन संघाकडून बेडिंगघमने सर्वाधिक ४५ धावा केल्या. (WTC Final)
(हेही वाचा – Ahmedabad plane crash : मुलाची भेट राहूनच गेली; सांगोल्यातील दांपत्याची व्यथा)
पण, ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू झाला तेव्हा खेळपट्टी अधिक खराब झाली होती. आणि ऑस्ट्रेलियाची अवस्थाही म्हणता म्हणता ७ बाद ७३ अशी झाली.
Australia extend their lead past 200 despite South Africa’s strikes to leave the #WTC25 Final evenly poised 🔥#SAvAUS
How the game panned out today ➡️ https://t.co/BZICeC71OJ pic.twitter.com/gDRMdPhH6V
— ICC (@ICC) June 12, 2025
(हेही वाचा – ३८१ सिंचन आणि ४५ जलविद्युत प्रकल्पांच्या कामांना गती द्या; CM Devendra Fadnavis यांचे स्पष्ट आदेश)
आणि त्यामुळे सामन्यात रंगतही निर्माण झाली. दुसऱ्या डावांत ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे पाच फलंदाज एकेरी धावसंख्येवरच बाद झाले. रबाडाने उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) आणि कॅमेरुन ग्रीन (Cameron Green) यांना एकाच षटकात बाद करून खिंडार पाडलं. नंतर स्टिव्ह स्मिथ, वेबस्टर आणि ट्रेव्हिस हेडही झटपट बाद झाले. कमिन्सही ६ धावा करून बाद झाला. चेंडूला जोरदार स्विंग होता. पण, पहिल्या व दुसऱ्या स्लिपपर्यंत चेंडू पुरेसे पोहोचत नव्हते. त्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे कित्येक झेल हे स्लिपमधील क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचूच शकले नाहीत. अशा विचित्र परिस्थितीत ॲलेक्स कॅरीने (Alex Carey) ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सावरला. (WTC Final)
त्याने ४३ धावा करत मिचेल स्टार्कबरोबर ६१ धावांची अत्यंत मौल्यवान भागिदारी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची आघाडी दोनशेच्या पार जाऊ शकली. आणि ऑस्ट्रेलियन संघही दीडशेच्या जवळ पोहोचला. आता कसोटीच्या तिसऱ्या दिवशी खेळपट्टीवरील लाल रंग आणखी गडद होताना दिसत आहे. शिवाय हवामान कसं असेल यावरही बरंच काही अवलंबून आहे. चौथ्या डावांत दोनशे धावांचा पाठलागही आव्हानात्मक असणार आहे. (WTC Final)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community