WTC Final : स्टिव्ह स्मिथने ‘या’ बाबतीत गॅरी सोबर्स आणि डॉन ब्रँडमन यांनाही टाकलं मागे

WTC Final : कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत स्मिथने ६६ धावा करत ऑस्ट्रेलियन डाव सावरला. 

169
WTC Final : स्टिव्ह स्मिथने 'या' बाबतीत गॅरी सोबर्स आणि डॉन ब्रँडमन यांनाही टाकलं मागे
  • ऋजुता लुकतुके

२०२५ च्या आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवला असला तरी दोन फलंदाज खेळपट्टीवर टिकून राहण्याचा प्रयत्न करताना दिसले. यातील एक होता माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथ. त्याने ११२ चेंडूंत ६६ धावा करताना ऑस्ट्रेलियन डाव सावरण्यात मोठी भूमिका बजावली. २ बाद १६ अशी संघाची अवस्था असताना तो फलंदाजीला आला. त्यानंतरही लबुशेन आणि ट्रेव्हिस हेड बाद झाल्यावर त्याने आपला चिवट प्रतिकार सोडला नाही. वेबस्टरची साथ मिळाल्यावर अर्धशतकी भागिदारी करत त्याने ऑस्ट्रेलियाला दोनशेच्या जवळ आणलं. (WTC Final)

(हेही वाचा – Virat Kohli : ‘विराट कोहलीची निवृत्ती संवेदनशीलतेनं हाताळायला हवी होती,’ – रवी शास्त्री)

ही कामगिरी करतानाच स्मिथने एका विक्रमालाही गवसणी घातली आहे. चक्क डॉन ब्रँडमन, गॅरी सोबर्स यांना मागे टाकलं आहे. इंग्लंडमध्ये एकाच मैदानावर सर्वाधिक धावा करणारा तो परदेशी खेळाडू ठरला आहे. लॉर्ड्सवर आता स्मिथने ५९१ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ब्रॅडमन (५५१) आणि सोबर्स (५७१) यांना मागे टाकलं आहे. लॉर्ड्स हे क्रिकेटमधील ऐतिहासिक मैदान मानलं जातं. इथं धावा करणाऱ्या पाहुण्या संघातील फलंदाजांमध्ये आता स्मिथ सगळ्यात यशस्वी फलंदाज ठरला आहे. इथे धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये वॉरन बार्डस्ली, दिलीप वेंगसरकर, ॲलन बोर्डर आणि शिवनारायण चंद्रपॉल असे दिग्गज फलंदाज आहेत. लॉर्डला क्रिकेटचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं आणि इथं पाहुण्या संघातील ७ खेळाडूंनी ५०० पेक्षा जास्त धावा जमवल्या आहेत. त्यांची नावं पाहूया, (WTC Final)

(हेही वाचा – Air India Plane Crash : अपघातानंतर एअर इंडियाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…  )

लॉर्ड्सवर ५०० पेक्षा जास्त धावा करणारे पाहुणे फलंदाज
  • स्टिव्ह स्मिथ – ५९१
  • गॅरी सोबर्स – ५७१
  • डॉन ब्रँडमन – ५५१
  • शिवनारायण चंद्रपॉल – ५१२
  • दिलीप वेंगसरकर – ५०८
  • ॲलन बोर्डर – ५०३ (WTC Final)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.