-
ऋजुता लुकतुके
आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत अखेर तिसरा दिवस फलंदाजांनी गाजवला. लॉर्ड्सच्या मैदानावर सूर्य तळपायला लागल्यावर फलंदाजांनी आपलं कसब दाखवून दिलं आहे. ऑस्ट्रेलियाने २८२ धावांचं लक्ष्य समोर ठेवलं असताना आफ्रिकन संघाने तिसऱ्या दिवस अखेर २ बाद २१३ धावा केल्या आहेत. म्हणजे आता त्यांना विजयासाठी ६९ धावांची गरज आहे आणि हातात ८ गडी बाकी आहेत. त्यामुळे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला नवीन विजेता मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. (WTC Final)
या कसोटीच्या पहिल्या दोन दिवशी प्रत्येकी १४ बळी गेले होते. तेच तिसऱ्या दिवशी फक्त ४ गडी बाद होऊ शकले. ऑस्ट्रेलियन संघानेही ८ बाद १४८ वरून तिसऱ्या दिवशी सर्वबाद २०७ धावांची मजल मारली. मिचेल स्टार्कने नाबाद ५८ धावा करत ऑस्ट्रेलियाला ही मजल गाठून दिली. तर ११ व्या क्रमांकाच्या जोश हेझलवूडनेही १७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या दोन जोड्यांनी पहिलं सत्र खेळून काढलं. आफ्रिकन संघाला विजयासाठी २८२ धावांचं लक्ष्य मिळालं. (WTC Final)
(हेही वाचा – Veer Savarkar : सावरकरबंधूंचा अवमान अजून किती सहन करणार?; सात्यकी सावरकरांनी उपस्थित केला सवाल)
Aiden Markram and Temba Bavuma guide South Africa to the brink of #WTC25 glory 🙌
Look how the day unfolded 👉 https://t.co/pQ7yVByD1d pic.twitter.com/kHI8s8GDg7
— ICC (@ICC) June 13, 2025
लॉर्ड्स मैदानावर टळटळीत ऊन होतं. त्यामुळे चेंडूला आधीच्या तुलनेत स्विंग मिळत नव्हता. त्यामुळेच आफ्रिकन फलंदाजांनी आधीच दोनशेचं लक्ष्य पार करण्याजोगं आहे असं म्हणायला सुरुवात केली होती. सलामीवीर एडन मार्करम आणि कर्णधार तेतेंदू बमुआने ते आपल्या फलंदाजीने दाखवून दिलं. रिकलटन (६) आणि मूलडर (२७) धावांवर बाद झाल्यावर मार्करम आणि बमुआ यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला. त्यांनी षटकामागे ६ धावांच्या गतीने फलंदाजी केली. त्यामुळे आफ्रिकन फलंदाजांची सकारात्मक वृत्ती दिसली आणि त्यातच मार्करम आणि बमुआ या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी नाबाद १४४ धावा जोडत विजयासाठी प्रयत्न सुरू ठेवले. (WTC Final)
मार्करमने झुंजार खेळाचं प्रात्यक्षिक दाखवत नाबाद १०२ धावा केल्या आहेत. यात त्याने ११ चौकार लगावले. आणि एकाही ऑस्ट्रेलियन गोलंदाजासमोर तो गडबडून गेला नाही. तर बमुआने पायाचा स्नायू दुखावल्यानंतर जिगरबाज खेळ करत नाबाद ६५ धावा केल्या आहेत. आफ्रिकेकडून ट्रिस्टियन स्टब्ज, बेडिंगटन आणि वेराईन हे तीन निव्वळ फलंदाज खेळायचे आहेत. तर ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशीही विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे. (WTC Final)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community