World Test Championship : दक्षिण आफ्रिकेकडून प्लेइंग ११ ची घोषणा; पाहा कुणा-कुणाला मिळाली संघात संधी?

World Test Championship : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप(World Test Championship) फायनल २०२५ सामना लंडनच्या लॉर्डस मैदानावर खेळविण्यात येणार आहे.

89

World Test Championship : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप(World Test Championship) फायनल २०२५ सामना लंडनच्या लॉर्डस मैदानावर खेळविण्यात येणार आहे. बुधवार, ११ जूनला दोन्ही देशांत अंतिम सामना रंगणार असून टेस्ट चॅम्पियनशीप(World Test Championship)वर कोण नाव कोरणार, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष असणार आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्याकरिता संघातील ११ खेळाडूंची घोषणा केली आहे.(World Test Championship)

(हेही वाचा कोरोनाची उत्पत्ती झालेल्या चीनी लॅबमधील संशोधकाला FBI ने केली अटक; तपासणीत धक्कादायक बाब उघड )

दरम्यान, टेस्ट चॅम्पियनशीप(World Test Championship)च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ सलग दुसऱ्यांदा प्रवेश करत आहे. तर दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच अंतिम सामना खेळणार असून जागतिक अंजिक्यपद जिंकण्याची नामी संधी असणार आहे. त्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वाच्या नजरा दक्षिण आफ्रिकेच्या कामगिरीकडे असतील. एकूणातच, टेम्बा बवुमाच्या नेतृत्वातील दक्षिण आफ्रिकेचा संघ रेड-बॉल इतिहासात एक नवीन अध्याय लिहिण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

असा असेल दक्षिण आफ्रिकेचा संघ

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन: टेम्बा बावुमा(कर्णधार), एडन मार्क्रम, रायन रिकेल्टन, विआन मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरीन, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.

दोन्ही संघांचा लॉर्डस् मैदानावरचा इतिहास

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने बुधवार, ११ जूनपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्याकरिता प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. महत्त्वाचे म्हणजे, याआधी १९९१ पासून, दक्षिण आफ्रिकेने लॉर्ड्सवर फक्त एकदाच पराभव पत्करला आहे. तर ०५ सामने जिंकले असून एकच सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे मागील इतिहास पाहता, दक्षिण आफ्रिकेच्या विजयाची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे, गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने ४० सामन्यांपैकी १८ सामन्यांत विजय मिळविले आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू कर्णधार टेम्बा बवुमा!

डिसेंबर २०१९ पासून, कर्णधार बवुमा कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. या धावा बवुमाने ५०च्या सरासरीने केल्या आहेत. टेस्ट अजिंक्यपद स्पर्धा २०२३-२५ च्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा संघ ६९.४४-पॉइंट टक्केवारीसह अव्वल स्थानी राहिला. तसेच, कर्णधार टेम्बा बवुमाच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच अंतिम सामन्यात खेळणार आहे. टेम्बा बवुमाचा कसोटी क्रिकेटमधील कामगिरीवर नजर टाकल्यास, बवुमाने २४ सामन्यांमध्ये ४८.४८ च्या सरासरीने व ५० च्या स्ट्राईक रेटने १७९४ धावा केल्या आहेत. ज्यात ०३ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे.(World Test Championship)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.