World Test Championship : कसोटी अजिंक्यपद अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचं पारडं जड?

World Test Championship : दोन्ही संघांनी आपले अंतिम अकरा खेळाडू जाहीर केले आहेत. 

95
WTC Final : कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना अनिर्णित राहिला; पावसात वाहून गेला तर?
  • ऋजुता लुकतुके

बुधवारपासून लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमने सामने येतील. दोघांनीही आपला अंतिम अकरा जणांचा संघ जाहीर केला आहे आणि सध्या कागदावर तरी ऑस्ट्रेलियन संघ समतोल वाटतोय. त्यांचा एकेकाळी कसोटी क्रमवारीत अव्वल असलेला फलंदाज मार्कस लबुशेन संघात परतला आहे. तो सलामीला उस्मान ख्वाजाच्या साथीने उतरणार आहे. (World Test Championship)

तर तेज त्रिकुटात मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सच्या साथीला जोश हेझलवूड असणार आहे. बोलंडला वगळण्याचा निर्णय संघ प्रशासनाने घेतला आहे. ऑस्ट्रेलियन संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जिंकून किंवा निदान कसोटी अनिर्णित राखून आपलं विजेतेपद राखण्याचा प्रयत्न करेल. यापूर्वी २०२३ मध्ये भारतीय संघाचा पराभव करत त्यांनी या आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची गदा आपल्या ताब्यात घेतली आहे. (World Test Championship)

(हेही वाचा – गाझाला मदत करणाऱ्या Greta Thunberg वर इस्रायलची मोठी कारवाई; एक्सवर फोटो पोस्ट)

आणि दोन वर्षांच्या या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या कालावधीत ऑस्ट्रेलियन संघ कसोटी मालिकांमध्ये अपराजित आहे. त्यांनी परदेशात जाऊन न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवले आहेत. इंग्लंडमध्ये ॲशेस आपल्याकडे राखली आहे. तर मायदेशात पाकिस्तान आणि भारताविरुद्ध मोठे विजय मिळवले आहेत. वेस्ट इंडिज विरुद्धची त्यांची मालिका अनिर्णित राहिली होती. (World Test Championship)

दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारताने बोर्डर – गावस्कर मालिकेत १-४ ने पराभव पत्करल्यामुळे आफ्रिकन संघाला संधी निर्माण झाली. ती त्यांनी दोन्ही हातांनी झेलली. पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवत त्यांनी अंतिम फेरीत धडक दिली आहे. बुधवारी लॉर्ड्सवर भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता पहिल्या दिवसाचा खेळ सुरू होईल. (World Test Championship)

(हेही वाचा – School Timing : राज्यात शाळांच्या वेळेत मोठा बदल! आता सकाळी ७ ऐवजी ९ वाजता …)

दोन्ही संघांनी अंतिम अकरा खेळाडूंची निवड जाहीर केली आहे. संघांवर एक नजर टाकूया,

ऑस्ट्रेलिया – पॅट कमिन्स (कर्णधार), मार्कस लबुशेन, उस्मान ख्वाजा, कॅमेरुन ग्रीन स्टिव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, बो वेबस्टर, ॲलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन व जोश हेझलवूड

द आफ्रिका – टेंबा बवुमा (कर्णधार), एडन मार्करम, रायन रिकलटन, वियान मल्डर, ट्रिस्टियन स्टब्ज, डेव्हिड बेहिंगम, काईल वेरिन, मार्को यानसेन, केशव महाराज, कासिगो रबाडा व लुंगी एनगिडी

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.