
-
ऋजुता लुकतुके
टेनिसमधील सगळ्यात मोठी ग्रँडस्लॅम असलेल्या विम्बल्डन स्पर्धेत यंदा बक्षिसाची रक्कम ५३.५ दशलक्ष पाऊंड्स म्हणजेच ७३ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी ठेवण्यात आली आहे. हा एक उच्चांक आहे. यंदा महिला व पुरुष विजेत्यांना प्रत्येकी ४० लाख अमेरिकन डॉलर इतकी भरघोस रक्कम मिळणार आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत बक्षिसाची रक्कम ७ टक्क्यांनी जास्त आहे. ग्रँडस्लॅम स्पर्धा टेनिसमध्ये यशस्वी आहेत. त्यामुळे व्यावसायिक टेनिसपटू नेहमीच त्यांना नफ्यातील जास्त वाटा मिळावा यासाठी आग्रही असतात. ही मागणी गृहित धरुनच ही रक्कम जाहीर करण्यात आली आहे. (Wimbledon 2025)
(हेही वाचा – Mumbai Railway Accident : धक्कादायक ! घाटकोपरमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू !)
एकेरीत पहिल्या फेरीत पराभूत होणारा खेळाडूही यंदा ६६,००० पाऊंड्स घेऊन घरी जाणार आहे. ही वाढ गेल्यावर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांची आहे. ‘खेळाडूंबरोबर सातत्याने केलेल्या चर्चेनंतर आम्ही वाढ ठरवली आहे. विम्बल्डनचं धोरण कायमच खेळाडूंना बरोबर घेऊन चालण्याचं आहे,’ असं स्पर्धेचे प्रमुख देबरा जेवान्स मीडियाशी बोलताना म्हणाले. आंतरराष्ट्रीय व्यावसायिक टेनिसचा कार्यक्रम आधीच्या तुलनेत व्यस्त झाला आहे. त्यामुळे खेळाडूंचा प्रवास आणि सरावाचा खर्चही वाढला आहे. शिवाय अधिक ताणामुळे दुखापतीही वाढल्या आहेत. अशावेळी टेनिसपटूंची असोसिएशन आणि एटीपी टूअर तसंच ग्रँडस्लॅम स्पर्धा आयोजक यांच्यात सध्या अखंड वाटाधाटी सुरू आहेत. खेळाडूंना सामाजिक सुरक्षा देण्यावरही विचार सुरू आहे. विम्बल्डनच्या आयोजकांनीही या चर्चेत पुढाकार घेण्याची तयारी दाखवली आहे. (Wimbledon 2025)
(हेही वाचा – ऑपरेशन चक्र-५ अंतर्गत CBI चे १० ठिकाणी छापे; कल्याणमधून एकाला अटक)
यंदा विम्बल्डन स्पर्धा ३० जून ते १३ जुलै दरम्यान रंगणार आहे. जगातील ही सगळ्यात जुनी ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे. पारंपरिकता टिकावी यासाठी आयोजकांनी ती ग्रासकोर्टवरच भरवण्याचा अट्टाहास इतकी वर्षं धरला आहे. यंदा मात्र स्पर्धेत थोडी आधुनिकता आणण्याचा त्यांचा विचार आहे. स्पर्धेत लाईनमनना टीव्ही रिप्ले तसंच तांत्रिक मदत मिळणार आहे. त्यामुळे चेंडू कोर्टच्या बाहेर गेला असेल आणि सर्व्हिस सदोष असेल तर ते टीव्ही कॅमेरे सांगणार आहेत. विम्बल्डनमध्ये या प्रणालीचा वापर पहिल्यांदा होणार आहे. (Wimbledon 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community