Wimbledon 2024 : माजी इंग्लिश चॅम्पियन अँडी मरेची विम्बल्डन एकेरीतून माघार

Wimbledon 2024 : एकेरीतून माघार घेत असला तरी मरे दुहेरीत खेळणार आहे 

78
Wimbledon 2024 : माजी इंग्लिश चॅम्पियन अँडी मरेची विम्बल्डन एकेरीतून माघार
Wimbledon 2024 : माजी इंग्लिश चॅम्पियन अँडी मरेची विम्बल्डन एकेरीतून माघार
  • ऋजुता लुकतुके 

दोन वेळा विम्बल्डन विजेता अँडी मरेनं (Andy Murray) यंदाही स्पर्धेच्या एकेरीतून माघार घेतली आहे. अलीकडेच्या त्याच्या पाठीच्या कण्याजवळ झालेल्या गाठीवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यातून तो सावरला असला तरी खेळताना त्याला अजूनही त्रास होतोय. त्यामुळे पहिल्या फेरीनंतर त्याने एकेरीतून माघार घ्यायचं ठरवलंय. दुहेरीत मात्र भाऊ जिमी मरेच्या (Jimmy Murray) साथीने तो खेळणार आहे. (Wimbledon 2024)

(हेही वाचा- T20 World Cup 2024 : कमिन्सची सलग दोन सामन्यांत हॅट-ट्रीक, अंतिम सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या…टी-२० विश्वचषकातील नवीन विक्रम )

मरेच्या संपर्क प्रमुखांनी मंगळवारी या बातमीला दुजोरा दिल्याचं रॉयटर्स वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. गेल्याच आठवड्यात मरेवर पाठीची शस्त्रक्रिया पार पडली होती. ‘विम्बल्डनसाठी तंदुरुस्त व्हावं यासाठी मरेनं प्रामाणिक आणि अटोकाट प्रयत्न केले. पण, अखेर एकेरीतून माघार घेण्याचा अतिशय कठीण निर्णय त्याला घ्यावा लागला आहे,’ असं मरेच्या (Andy Murray) संपर्क यंत्रणेनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.  (Wimbledon 2024)

 ३७ वर्षीय मरेची ही शेवटची विम्बल्डन स्पर्धा असणार आहे. ‘एकेरी खेळता येणार नसल्यामुळे मरे अत्यंत दु:खी झाला आहे. पण, दुहेरीच्या निमित्ताने त्याला स्पर्धेत खेळता येणार आहे. आपला भाऊ जेमीबरोबर तो दुहेरीत उतरणार आहे,’ असं मरेनं जाहीर केलं आहे. (Wimbledon 2024)

(हेही वाचा- Hathras Stampede : हाथरस चेंगराचेंगरीतील मृतकांचा आकडा १२१ वर; भोलेबाबाचे नाव एफआयआरमधून वगळले)

यापूर्वी २०१३ आणि २०१६ मध्ये अँडी मरेनं (Andy Murray) विम्बल्डन विजेतेपद पटकावलं आहे. पहिल्या विजेतेपदाच्या वेळी ७७ वर्षांनंतर स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारा तो पहिला ब्रिटिश खेळाडू ठरला होता. पाठीच्या शस्त्रक्रियेपूर्वीच त्याने हे आपलं शेवटचं व्यावसायिक वर्ष असेल असं सुतोवाच केलं आहे. विम्बल्डन आणि मागाहून होणारी ऑलिम्पिक स्पर्धा त्याला खेळायची आहे. (Wimbledon 2024)

ऑलिम्पिक (Olympic) दरम्यान तो आपली निवृत्ती जाहीर करेल, असाही एक अंदाज ग्रेट ब्रिटनमध्ये व्यक्त होत आहे. (Wimbledon 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.